तीन वेळच्या आमदाराला पोलिसांनी तंगड्या उचलून फेकून दिलं, जंतरमंतरच्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल

दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, आज थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान ही घटना घडली आहे.

तीन वेळच्या आमदाराला पोलिसांनी तंगड्या उचलून फेकून दिलं, जंतरमंतरच्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल
Akhilesh Tripathi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 20, 2026 | 7:37 PM

दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, आज थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान यावेळी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. याचवेळी जंतर मंतरवर एक घटना घडली आहे. ती म्हणजे पोलिसांनी आपचे माजी आमदार अखिलेश त्रिपाठी यांना तंगड्या उचलून थेट बॅरिगेडवरून फेकून दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आज संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता.  यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा देखील मारा केला. तसेच पोलिसांकडून लाठीचार्ज  देखील करण्यात आला, दरम्यान या आंदोलनाला आम आदमी पार्टीने देखील पाठिंबा दिला आहे. आम आदमी पार्टीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते, याचवेळी ही घटना घडली. आंदोलनात सहभागी झालेले आपचे माजी आमदार अखिलेश त्रिपाठी यांना पोलिसांनी थेट तंगड्या उचलून बॅडिगेडवरून फेकून दिल्याचं पहायला मिळालं आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

आपचे नेते संजय सिंग यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. दिल्ली पोलिसांनी तीनवेळा आमदार राहिलेल्या व्यक्तीला जनवारासारखी वागणूक दिल्याचं त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोण आहेत अखिलेश त्रिपाठी

अखिलेश त्रिपाठी हे 2013 ते 2025 या काळात दिल्लीच्या मॉडेल टाऊन विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.  तसेच ते आम आदमी पक्षाच्या  पूर्वांचल शाखेचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. पक्षाकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचा चांगाल फॅन फॉलिंग आहे. ट्विटवर त्यांना 7855 जणांनी फॉल केलं आहे.  अखिलेश त्रिपाठी हे मुळचे उत्तर प्रदेशचे असून, संत कबीर नगर जिल्ह्यात त्यांचं गाव आहे. त्यांनी राम मोहन लोहिया अवध विद्यापीठातून इतिहास विषयामध्ये एमए केलं आहे. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

Follow Us