प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटचा डेटा चोरीला, 20 लाख युजर्सला झटका

एका प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटच्या युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे (Porn Website data leak by hackers)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:20 PM, 24 Jan 2021
प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटचा डेटा चोरीला, 20 लाख युजर्सला झटका

मुंबई : एका प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटच्या युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. काही हॅकर्सने पॉर्न वेबसाईटवरील युजर्सचे ई-मेल आयडी आणि इतर काही वैयक्तिक माहिती चोरी केली आहे. या माहितीच्या आधारावर हॅकर्स यूजर्सला ब्लॅकमेल किंवा पैशांची मागणी करु शकतात. पैशांसाठी हॅकर्स कोणत्याही थरावर जाऊ शकतात. त्यामुळे चिंता वाढली आहे (Porn Website data leak by hackers).

मिळालेल्या माहितीनुसार, MyFreeCams नावाची पॉर्न वेबसाईट लीक झाली आहे. या वेबसाईटवरील 20 लाख यूजरची वैयक्तिक माहिती चोरीला गेली आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये यूजरची ई-मेल आयडी, पत्ता, यूजरनेम, पासवर्ड यांचा समावेश आहे. संबंधित वेबसाईटने यूजर्सची माहिती चोरी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

विशेष म्हणजे पॉर्न वेबसाईटवर चोरी केलेली माहिती एका प्रसिद्ध फोरमला विकली जाणार आहे. हॅकर्सकडून या माहितीच्या बदल्यात बिटकॉईनची डिमांड केली जात आहे. हॅकर्सने 10 हजार यूजरच्या बदल्यात 1500 डॉलर बिटकॉईनची मागणी केली आहे.

MyFreeCams या प्रसिद्ध वेबसाईटला महिन्याला सात कोटी युजर भेट देतात. हॅकर्स युजर्सची MyFreeCams वेबसाईटवरील टोकन बॅलेन्सही संपवू शकतात. याशिवाय हॅकर्स युजर्सला मेलद्वारे ब्लॅकमेल करु शकतात. युजर्सची माहिती त्यांच्या कुटुंबातील लोकांना सांगण्याची धमकी देवून लोकांना घाबरवलं जाण्याची शक्यता आहे (Porn Website data leak by hackers).

हेही वाचा : Fact Check : पुण्यातील सिंबायोसिस रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार मोफत, व्हायरल मॅसेजमधील तथ्य काय?