मोठी बातमी! बंडखोर खासदारांकडून एक मोठी चूक, अपात्रतेची कारवाई होणार? वर्षभरात पुन्हा निवडणुकीचा दावा
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. या बंडखोर खासदारांवर आता अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडून या खासदारांच्या गटाला मान्यता देण्यात आल्यामुळे या खासदारांवरील अपात्रतेची कारवाई टळली आहे. मात्र दुसरीकडे अशीच स्थिती ममता बॅनर्जी प्रमुख असलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये देखील निर्माण झाली होती. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पराभव होताच तृणमूलमध्ये मोठी फूट पडली.
तृणमूल काँग्रेसच्या वीस खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. त्यांनी एनसीपीआय पक्षात प्रवेश केला. दरम्यान या खासदारांच्या गटाला अजूनही मान्यता मिळालेली नाहीये, हे प्रकरण सध्या लोकसभा अध्यक्षांकडे आहे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने या प्रकरणात न्यायालयात धाव घेतली आहे. लोकसभा अध्यक्षांकडून या सर्व खासदारांना तुम्ही तृणमूलमधून एनसीपीआयमध्ये का प्रवेश केला? तसेच तुमच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत करावाई का केली जाऊ नये? अशी विचारणा करणारी नोटीस पाठवण्यात आली होती.
या नोटीसला उत्तर देण्यासाठी या खासदारांना दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला होता. दोन आठवड्यात नोटीसला उत्तर देणं बंधनकारक होतं. परंतु या खासदारांनी अजूनही या नोटीसला उत्तर दिलं नाही. त्यांनी आता लोकसभा अध्यक्षांकडे आणखी दोन आठवड्याचा वेळ मागितला आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष हे लोकसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात याकडे लागलं आहे. जर लोकसभा अध्यक्षांनी या खासदारांना वेळ वाढवून दिला नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठे नेते कल्याण बॅनर्जी यांच्याकडून आधीच दावा करण्यात आला आहे. या खासदारांवर वर्षाच्या आत अपात्रतेची कारवाई होऊ शकते, त्या मतदारसंघात पुन्हा पोट निवडणुका होऊ शकतात, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
