दिल्ली प्रदूषणावर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांचा स्तुत्य तोडगा

पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नामी शक्कल लढवत संसदेत चक्क इलेक्ट्रिक कारने हजेरी लावली

दिल्ली प्रदूषणावर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांचा स्तुत्य तोडगा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणाने अत्युच्च पातळी गाठली आहे. अशा गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु असतानाच भाजप खासदार आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नामी शक्कल लढवली. जावडेकर चक्क इलेक्ट्रिक कारने संसदेत (Prakash Javadekar Solution on Pollution) आले.

देशात प्रदूषणाचे गंभीर परिणाम जाणवू लागले आहेत. दिल्लीत प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. पर्यावरण मंत्री या नात्याने जावडेकरांनी आदर्श पावलं उचलण्याचं ठरवलं.

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून दिल्लीत सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रकाश जावडेकर इलेक्ट्रिक कारने संसद भवनात दाखल झाले. जावडेकरांकडे सगळ्यांच्याच नजरा वळल्या.

सरकार हळूहळू इलेक्ट्रिक कार वापरण्यावर भर देत आहे. देशाला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने हातभार लावावा, इलेक्ट्रिक वाहनं किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असं आवाहन यावेळी प्रकाश जावडेकर यांनी केलं.

इलेक्ट्रिक कार विजेवर चालत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सायकल किंवा इलेक्ट्रिक कार वापराव्यात किंवा मेट्रो, बस यासारख्या सार्वजनिक वाहनांनी प्रवास करुन वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करावा, असं आवाहन बरेच वेळा केलं जातं.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आक्रमक, संसदेबाहेर आंदोलन करुन सभात्याग

प्रकाश जावडेकर यांच्याकडे गेल्याच आठवड्यात अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar Solution on Pollution) यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सुपूर्द करण्यात आला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *