आता माझ्या हातात… निधनाच्या 10 दिवस आधी प्रतीक यादव यांची पोस्ट, शेवटचा व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील!

प्रतीक यादव यांनी निधनापूर्वी ३ एप्रिल रोजी एक इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर केला होता. 'आता नियंत्रण माझ्या हातात आहे' अशी कॅप्शन असलेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आता माझ्या हातात... निधनाच्या 10 दिवस आधी प्रतीक यादव यांची पोस्ट, शेवटचा व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील!
Prateek Yadav last Instagram post
| Updated on: May 13, 2026 | 1:55 PM

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील दिग्गज नेते दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अत्यंत फिट आणि उत्साही व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतीक यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतीक यादव यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र दोन प्रमुख शक्यता वर्तवल्या जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रतीक यांना गेल्या काही काळापासून यकृत (Liver) आणि फुफ्फुसांच्या (Lungs) गंभीर समस्या होत्या. यासाठी त्यांना लखनौच्या मेदांता रुग्णालयात वारंवार दाखल करावे लागत असे. प्रकृती खालावली की त्यांना रुग्णालयात नेले जाई. उपचारानंतर १-२ दिवसात डिस्चार्ज मिळत असे.

तर दुसरीकडे त्यांचे जिम पार्टनर स्वप्नेश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या आदल्या रात्री प्रतीक यांची प्रकृती बिघडली होती. रात्री ११-१२ च्या सुमारास ते लखनौ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथून घरी परतल्यानंतर ते बेडरूममध्ये पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा दावा केला जात आहे.

इन्स्टाग्रामवरील शेवटची पोस्ट

प्रतीक यादव यांना साहसी खेळांची आणि फिटनेसची प्रचंड आवड होती. याच पार्श्वभूमीवर ३ एप्रिल रोजी त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते EA 300 या लहान विमानाच्या कॉकपिटमध्ये बसलेले दिसत आहेत. याला त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे.

इंजिनाची गर्जना सुरु झाली, आकाश मोकळे आहे आणि आता नियंत्रण माझ्या हातात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विमानात कसरती करतानाचा हा अनुभव टॉप गन चित्रपटातील थरारक दृश्यासारखा आहे. हा एड्रेनालाईनचा शुद्ध अनुभव आहे, असेही प्रतिक यादव यांनी म्हटले आहे.

आपल्या फिटनेस आणि ऊर्जेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुणाचा असा अचानक अंत होईल, अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. स्वप्नेश पांडे यांनी प्रतीक यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रतीक केवळ एक जिम पार्टनर नव्हता, तर तो सर्वांचा आदर करणारा एक चांगला माणूस होता. लहान असो वा मोठा, तो प्रत्येकाशी नम्रतेने वागायचा,” असे स्वप्नेश पांडे यांनी सांगितले.

राजकीय कुटुंबावर दुखाचा डोंगर

मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर यादव कुटुंब या मोठ्या धक्क्यातून सावरत असतानाच प्रतीक यांच्या मृत्यूने कुटुंबावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. त्यांच्या पत्नी अपर्णा यादव या उत्तर प्रदेश भाजपमधील सक्रिय नेत्या आहेत. प्रतीक स्वतः सक्रिय राजकारणापासून दूर राहिले असले तरी, व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळात त्यांचा मोठा वावर होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us