AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prateek Yadav Death : प्रतीक यादवच्या निधनावेळी पत्नी अपर्णा यादव कुठे होत्या, पोलिसांनी फोन घेतला ताब्यात

Prateek Yadav Death : उत्तर प्रदेशच्या राजकारणात आज एक खळबळजनक घटना घडली आहे. समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या छोट्या मुलाचं आक्समिक निधन झालं आहे. घरातील किचनमध्ये प्रतीक यादव बेशु्द्धावस्थेत आढळला.

Prateek Yadav Death : प्रतीक यादवच्या निधनावेळी पत्नी अपर्णा यादव कुठे होत्या, पोलिसांनी फोन घेतला ताब्यात
Aparna-Prateek Yadav
| Updated on: May 13, 2026 | 10:23 AM
Share

समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा छोटा मुलगा प्रतीक यादवचं आज बुधवारी आकस्मिक निधन झालं. तो अवघ्या 38 वर्षांचा होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक घराच्या किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्यानंतर त्याला लगेच लखनऊच्या सिविल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रस्त्यातच त्याने प्राण सोडले. मुलायम सिंह यादव कुटुंबाचा उत्तर प्रदेशच्या राजकारणात दबदबा आहे. आता मुलायम सिंह यांचे मोठे सुपूत्र अखिलेश यादव या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा यादव भाजपमध्ये आहे. लखनऊ पोलीस प्रतीकची पत्नी अपर्णा यादव यांच्या घरी जाणार आहेत. पोलिसांनी प्रतीकचा फोन ताब्यात घेतला आहे. घरात किचनमध्ये प्रतीक बेशुद्ध अवस्थेत आढळला होता.

घरातील लोकांनी 4 वाजून 55 मिनिटांनी रुग्णालयाला याची माहिती दिली. जवळपास 6 वाजण्याच्या सुमारास प्रतीकला लखनऊच्या सिविल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी प्रतीकला मृत घोषित केलं. सध्या त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी KGMU येथे पाठवला आहे.

डॉक्टरांचं ऐकलं नाही

30 एप्रिल रोजी प्रतीकला मेदांता रुग्णालयात दाखल केलं होतं, असं कुटुंबातील सूत्रांनी सांगितलं. तिथे प्रतीकच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, मात्र तरीही डॉक्टर त्याला डिस्चार्ज देत नव्हते. प्रतीक घरी येण्यासाठी हट्ट करत होता. अखेर त्याने डॉक्टरांचं ऐकलं नाही. जबरदस्तीने रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी आलेला. घरी आल्यावर त्याच्यावर उपचार सुरु होते असं सूत्रांनी सांगितलं.

पतीच्या निधनावेळी अपर्णा यादव कुठे होत्या?

प्रतीकचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी KGMU मध्ये पाठवला आहे. संपूर्ण पोस्टमॉर्टमची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल. चार डॉक्टरांची टीम पोस्टमॉर्टम करेल. पोस्टमॉर्टम हाऊस बाहेर अपर्णा यादवचा भाऊ हजर आहे. अपर्णा यादव काल रात्री दिल्लीत होत्या. पतीच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर अपर्णा लखनऊसाठी रवाना झाल्या आहेत. प्रतीक यादव डिप्रेशनच्या आजाराचा सामना करत होता अशी माहिती आहे. त्याशिवाय नसांशी संबंधितही त्याला आजार होता. अखिलेश यादव KGMU रुग्णालयात पोहोचले आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?