President Election 2022: भाजप संसदीय मंडळाची आज बैठक; राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर होणार शिक्का मोर्तब

| Updated on: Jun 21, 2022 | 8:26 PM

राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात भाजप संसदीय मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

President Election 2022: भाजप संसदीय मंडळाची आज बैठक; राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर होणार शिक्का मोर्तब
गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट
Image Credit source: tv9marathi
Follow us on

नवी दिल्लीः राष्ट्रपती पदासाठीचा (President Election) भाजपकडून उमेदवार कोण असणार या मुद्यावर आज भाजपकडून बैठक होत असल्याने या मुद्यावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण आज भाजपच्या मुख्यालयात संसदीय मंडळाची बैठक (parliamentary board meeting) होत आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Pantpradhan Narendra Modi) उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भाजपकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात भाजप संसदीय मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

राष्ट्रपतीपदाच्या नावावर विचारमंथन

या भेटीपासून, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार बनविण्याच्या विचारात आहे का या अशा चर्चेनाही उधान आले आहे. आज भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होत असल्याने नायडूंसोबत शहा, राजनाथ आणि नड्डा यांची भेट महत्वाची मानली जात असल्याचे सांगितले जात आहे.या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन होण्याची शक्यता असल्याचेही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

संख्याबळाच्या आधारावर भाजपची स्थिती मजबूत

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, जेडीयू प्रमुख नितीश कुमार, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे.

 एनडीए मजबूत स्थितीत

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारावर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए मजबूत स्थितीत आहे. बीजेडी किंवा आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेससारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित होईल.