
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत घेतलेल्या मोहिमेवर संसदेतील सुरु असलेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की याआधी पाकिस्तानशी आपली अनेक युद्धे झालेली आहे. परंतू पण ही पहिली अशी लढाई होती, त्यात अशी रणनीती बनली की ज्यात पूर्वी जिथे कधीच गेलो नाही तिथे आपण गेलो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पहलगाममध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी धर्म विचारुन अगदी क्रुरपणे निष्पापांना ठार केले, त्यामुळे देशात दंगली देखील होऊ शकल्या असत्या. परंतू देशवासियांनी धैर्य राखले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आपण ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानाच्या कोनाकोपऱ्यातले दहशतवादी अड्डे तोडले. दहशतवाद्यांनाही वाटलं नसेल तिथे कोणी येईल. बहावलपूर आणि मुरिकदेलाही आपल्या सैन्याने जमीनदोस्त केले. आपल्या सैन्याने दहशतवादी अड्डे जमीनदोस्त केल्याचे पंतप्रधान यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला अंदाज आला होता की भारत काही तरी मोठी कारवाई करणार आहे. त्यामुळे त्यांनी न्यूक्लीअर स्फोटाची धमकी दिली होती.परंतू भारताने जसे ठरवलं होतं तशी कारवाई केली. आणि पाकिस्तान काहीच करू शकला नाही. २२ मिनिटात २२ एप्रिलचा बदला निर्धारीत लक्ष्य ठेवून आपल्या सैन्याने बदला घेतला. दुसरी बाजू अशी की पाकिस्तानसोबत अनेकदा लढाई झाली. पण ही पहिली अशी लढाई होती, अशी रणनीती बनली की ज्यात पूर्वी जिथे कधीच गेलो नाही तिथे आपण गेलो असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.