पहलगामनंतर सर्व जगाने दहशतवादाचा निषेध नोंदवला, पण पाकिस्तानचा नाही, का?; राहुल गांधी यांचा संतप्त सवाल
काँग्रेस नेते राहुल गांधी ऑपरेशन सिंदूर प्रकरणातील संसदेत सुरु असलेल्या चर्चेत सहभागी होत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या सैन्यांना जादा अधिकार देण्यात आले नव्हते असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवर संसदेत सुरु असलेल्या चर्चेप्रसंगी बोलताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर प्रसंगी भारतीय सैन्याचे हात बांधलेले होते. त्यांना पाकिस्तानच्या सैन्य तळ आणि एअर डिफेन्सवर हल्ला करण्याची परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे आपल्या सैन्याला अधिकार दिले नसल्याने नुकसान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. साऱ्या जगाने पहलगामनंतर दहशतवादाचा निषेध नोंदवला परंतू पाकिस्तानचा एकाही देशाने निषेध नोंदवला नाही असाही सवाल राहुल गांधी यांनी यावेळी केला.
संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. या चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी सरकारवर तिखट भाषेत हल्ला केला. राहुल गांधी यावेळी म्हणाले की आपले परराष्ट्रमंत्री म्हणाले, की सर्व देशाने टेररिझमचा निषेध नोंदवला.हे शंभर टक्के बरोबर आहे. परंतू आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे सांगितले नाही की पहलगाम नंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध नोंदवलेला नाही. फक्त दहशतवाद्याचा निषेध नोंदवाला. याचा अर्थ जग पाकिस्तानच्या बाजूने आहे.
ते ट्रम्पसोबत जेवत आहेत
पहलगाम नंतर अमेरिकेने पाकिस्तानचे जनरल मुनीर यांचे स्वागत केले.ज्यांनी पहलगामचा कट रचला त्यांना पायघड्या घातल्या जात आहेत. पहलगामच्या मागे जनरल मुनीर आहे. पण ते ट्रम्पसोबत जेवत आहेत. ट्रम्प सर्व प्रोटोकॉल तोडून मुनीरचं स्वागत करतात.आपले पंतप्रधान त्यांचा निषेधही नोंदवत नाही असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. दहशतवाद्यांचा हल्ला झाला तर आम्ही युद्ध करू असं तुम्ही सांगितलं आहे. परंतू तुम्ही दहशतवाद्यांना युद्धासाठीची खुली छूटच दिली. हे काय चाललंय. उद्या दहशतवाद्यांनी हल्ला केला तर तुम्ही काय करणार आहात? हे सरकार काय करत आहे असाही सवाल राहुल गांधी यांनी केला.
