AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-इस्रायल संघर्षाचा उल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला मोठा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत हा येत्या काळात विश्वासार्ह देश असेल असे म्हटले आहे. हीच ती वेळ आहे. हीच योग्य वेळ आहे असे मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात दीड कोटी लोकांना सुरक्षित भारतात आणल्याचं म्हटले आहे.

इराण-इस्रायल संघर्षाचा उल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला मोठा इशारा
PM modi
| Updated on: Apr 15, 2024 | 9:44 PM
Share

PM Modi on War : रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपने संकल्प पत्र जारी केले. हा जाहीरनामा लॉन्च करताना पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा पूर्वीपेक्षा मजबूत एनडीए सरकार स्थापन करण्याची मागणी केली. मोदींच्या या वक्तव्यामागे मोठा संकेत दडलेला आहे. ज्यांना राजकारण करळं त्यांना मोदी हे कधीच असं काहीही बोलत नाही याची समज आहे. कारण एकीकडे पश्चिम आशियात तणावाचे वातावरण आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे, दुसरीकडे इस्त्रायल-इराण यांच्यात संघर्ष सुरु आहे. यावर मोदी म्हणाले की त्यांचे सरकार वेळोवेळी परदेशात संघर्षाच्या परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यात यशस्वी झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक वेगवान विकासाची हीच भारताची वेळ आहे, असेही मोदी म्हणाले.

देशाला मजबूत एनडीए सरकारची गरज

जाहीरनाम्यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जगभरात तणावाचे वातावरण आहे. संघर्ष सुरू आहे. संकटाच्या या काळात संघर्षग्रस्त देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. जागतिक अशांततेच्या काळात, भारतात स्पष्ट बहुमत असलेल्या स्थिर सरकारची गरज अधिक स्पष्ट होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करून प्रगती आणि विकासाकडे नेणारे सरकार स्थापन करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे.

जागतिक भागीदार म्हणून भारत मानवतेच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील राहील. भारतीय जनता पक्ष खंबीरपणे देशहिताचे धाडसी आणि आव्हानात्मक निर्णय घेतो आणि देशाला प्राधान्य देतो. ते म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने भारताला जगासमोर एक विश्वबंधू मित्र म्हणून स्थापित केले.

१.५ कोटी भारतीयांना युद्धक्षेत्रातून बाहेर काढण्यात आले

मोदी सरकारच्या काळात संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या १.५ कोटी भारतीयांना बाहेर काढण्यात यश आल्याचे सरकारने म्हटले आहे. मोदी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत आम्ही भारताला जागतिक स्तरावर विश्वासार्ह आवाज म्हणून स्थापित केले आहे. आम्ही मानवतेच्या फायद्यासाठी भारताचे विचार आणि कृती स्वातंत्र्य प्रदर्शित केले आहे. आमच्या मानव-केंद्रित जागतिक दृष्टिकोनाने आम्हाला एक ग्लोबल आवाज बनण्यास मदत केली आहे. युद्धग्रस्त युक्रेन आणि इस्रायलसह इतर संघर्षग्रस्त भागांमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आले.

हीच योग्य वेळ

पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून लिहिलेल्या पत्राचाही भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला होता. या पत्रात त्यांनी भारताचा वेगवान विकास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढता प्रभाव याबद्दल तपशीलवार माहिती दिली. त्यांनी लिहिले की, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून संबोधित करताना मी म्हणालो होतो की हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. आज जगभरातील अनेक आदरणीय लोकही म्हणत आहेत की ही भारताची वेळ आहे. आज भारताला एक चांगले भविष्य घडवण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून पाहिले जाते.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....