भारत-अर्जेंटिना मैत्रीचे नवीन उदाहरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ब्युनोस आयर्स’ची चावी देऊन केले सन्मानित
पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ते १० जुलै दरम्यान पाच देशांच्या परराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शनिवारी ते अर्जेंटिना येथे पोहचले. त्यापूर्वी त्यांनी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो दौरा केला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहचले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आहे. ब्रिक्सच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान शनिवारी अर्जेंटिना येथे पोहोचल होते. अर्जेंटिनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय भव्य स्वागत करण्यात आले. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्यूनस आयर्स शहराची चावी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यापार मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा केली. इंदिरा गांधींनंतर अर्जेंटिनाचा द्विपक्षीय दौरा करणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. या भेटीनंतर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
अर्जेंटिना दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्यूनस आयर्स शहराचे प्रमुख जॉर्ज मॅक्री यांनी त्यांना ब्यूनस आयर्स शहराची चावी देऊन सन्मानित केले. सोशल मीडियावर याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ब्यूनस आयर्स शहराचे प्रमुख जॉर्ज मॅक्री यांच्याकडून ब्यूनस आयर्सची चावी स्वीकारणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.
काय आहे चावीचे महत्व
ब्यूनस आयर्स शहराची चावी शहराच्या मुख्य अधिकाऱ्याकडून एका खास व्यक्तीला दिली जाते. ही चावी त्या व्यक्तीला विशेषाधिकार वापरण्याची परवानगी देते. यासोबतच, ही चावी मैत्री आणि आदराचे प्रतीक देखील मानली जाते. १९६८ नंतर भारतीय पंतप्रधानांचा अर्जेंटिनाचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी १९६८ मध्ये ही द्विपक्षीय भेट दिली होती.
व्यापारी संबंध मजबूत होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायले यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. त्यांनी संरक्षण, शेती, खाणकाम, तेल आणि वायू यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. यासोबतच दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध मजबूत करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ते १० जुलै दरम्यान पाच देशांच्या परराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शनिवारी ते अर्जेंटिना येथे पोहचले. त्यापूर्वी त्यांनी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो दौरा केला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहचले. त्या ठिकाणी ब्रिक्स परिषदेत ते सहभागी होणार आहे.