अयोध्येत आज ऐतिहासिक क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या शिखरावर फडकवणार ध्वज, सकाळी 10 पासून ते…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अयोध्येच्या दाैऱ्यावर असून त्यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वज फडकवला जाणार आहे. यादरम्यान ते अगोदर अन्नपूर्णा देवीचे दर्शन घेतील. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच या कार्यक्रमासाठी देशातील अनेक लोकांना आमंत्रित करण्यात आलंय.

अयोध्येत आज ऐतिहासिक क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या शिखरावर फडकवणार ध्वज, सकाळी 10 पासून ते...
ram mandir
| Updated on: Nov 25, 2025 | 10:46 AM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राम मंदिराला आज भेट देतील. श्री राम जन्मभूमी मंदिरावर भगवा ध्वज फडकावतील. हा ध्वजारोहण म्हणजे मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचे प्रतिक असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज अयोध्येमध्ये कडक सुरक्षा आहे. हेच नाही तर काही वेळासाठी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाईल. राष्ट्रीय एकात्मता म्हणून याकडे बघितले जातंय, सध्या अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी हे सकाळी 10 वाजता अयोध्येत दाखल होतील. 11 वाजता ते अन्नपूर्णा देवीचे दर्शन घेतील आणि त्यानंतर ते राम दरबार गर्भगृहात पूजा करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारणपणे दुपारी 12 वाजता श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकावतील.

दुपारी 2.30 पर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असेल. यादरम्यान फक्त क्यूआर कोड केलेले पास असलेल्या आमंत्रित पाहुण्यांनाच परवानगी असेल. रामपथावरील वाहतूक सकाळी 6 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. साधारणपणे 2 वाजेपर्यंत नरेंद्र मोदी हे अयोध्येतून निघतील. नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दाैऱ्यादरम्यान अयोध्येत सुरक्षा यंत्रणांचे काटेकोरपणे लक्ष असणार आहे. प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवण्यात आलंय.

अयोध्या विमानतळावर एक विशेष लॉजिस्टिक्स योजना लागू करण्यात आली आहे. जवळपास 80 चार्टर्ड विमानांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. राम मंदिरावरील भगवा ध्वज फडकावण्याच्या कार्यक्रमाला देशभरातून काही लोकांना निमंत्रित करण्यात आलंय. या क्षणाचे साक्षीदार ते होतील. हेच नाही तर 100 अतिरिक्त सीआयएसएफ कर्मचारी तैनात केले जात आहेत. पंतप्रधानांसाठी एक विशेष लाउंज तयार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री, राज्यपाल आणि इतर पाहुण्यांसाठी सहा व्हीआयपी लाउंज तयार केले जात आहेत. राम मंदिराचा ध्वजारोहण समारंभ पूर्णपणे सुरक्षित पार पडावा याकरिता मोठी व्यवस्था करण्यात आली. हेच नाही तर सीआरपीएफ, एसपीजी, आयबी, एनएसजी आणि अयोध्या पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जातंय. तब्बल 15,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी पूर्ण परिसरात लक्ष ठेवले जातंय. देशातील जवळपास सर्वच नामवंत लोक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.