AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram mandir : रामलल्लाच्या मूर्तीसाठी वापरला गेलेला दगड इतक्या वर्ष जुना, ऐकून धक्काच बसेल

राम मंदिरात पाचशे वर्षानंतर रामलल्ला विराजमान झाले आहेत. राम मंदिर इतकं भव्य आहे की त्याची प्रत्येक गोष्ट खास आहे. मंदिरात बसवलेली रामलल्लाची मूर्ती ज्या दगडापासून बनवण्यात आली आहे त्या दगडाविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. कारण या दगडाचे आयुष्य ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल.

Ram mandir : रामलल्लाच्या मूर्तीसाठी वापरला गेलेला दगड इतक्या वर्ष जुना, ऐकून धक्काच बसेल
| Updated on: Jan 23, 2024 | 8:58 PM
Share

Ayodhya Ramlalla idol : अयोध्येच्या भव्य राम मंदिरात भगवान श्रीरामांची बालस्वरूपातील मूर्ती बसवण्यात आली आहे. काळ्या रंगाची ही मूर्ती असून त्याला विशेष महत्त्व आहे. या मूर्तीचे डोळे तेजस्वी दिसत आहेत. चेहऱ्यावर मोहक हास्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. आजपासून राम मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शनासाठी खुले झाले आहे. राम मंदिरात बसवलेली रामललाची मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. या मूर्तीची उंची 51 इंच आहे. ही मूर्ती काळ्या दगडापासून बनवली आहे. कर्नाटकातून आणलेले हे दगड २.५ अब्ज वर्षे (२२५ कोटी वर्षे) जुने असल्याचं सांगितले जात आहे. शास्त्रात काळ्या ग्रॅनाइटला कृष्ण शिला (शालिग्राम) असे ही म्हटले जाते.

कोणी केली दगडाची चाचणी

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स (NIRM), बंगळुरूने काळ्या ग्रॅनाइटची चाचणी केली. NIRM ही भारतातील धरणे आणि अणुऊर्जा प्रकल्पांसाठी खडकांची चाचणी करणारी नोडल एजन्सी आहे. या संस्थेचे संचालक एचएस व्यंकटेश यांनी फिजिको-मेकॅनिकल अॅनालिसिसचा वापर करून या दगडाची चाचणी केली आहे. या दगडाला कोणाताही तडा गेलेला नाही. या काळ्या दगडात पाणी शोषले जात नाही. त्यामुळे या मूर्तीवर अभिषेक केला तरी काहीही परिणाम होणार नाही. रामललाच्या मूर्तीला दुधाने अभिषेक केला किंवा चंदन लावले तरी काहीही परिणाम होणार नाही.

डॉ. व्यंकटेश यांनी सांगितले की, “काळे खडक अधिक टिकाऊ आणि हवामानास प्रतिरोधक असतात. त्यामुळे ते हजारो वर्षे टिकतात.” पृथ्वीच्या निर्मितीनंतर वितळलेला लावा थंड झाल्यावर ग्रॅनाइट खडक तयार होतो. राम मंदिर तयार करताना प्रत्येक गोष्टींची काळजी घेतली गेली आहे. मंदिरात उच्च दर्जाचे दगड वापरले आहेत. ते हजारो वर्षे टिकू शकतात. हे राम मंदिर 1000 वर्षांहून अधिक काळ टिकेल अशी रचना करण्यात आली आहे.

दगड कुठून आणला?

रिपोर्टनुसार, रामललाची मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात आलेला काळा दगड कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील जयपुरा होबळी गावातून आणण्यात आला होता. हा परिसर उच्च दर्जाच्या ग्रॅनाइट खाणींसाठी ओळखला जातो. पृथ्वीची उत्पत्ती सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे अशी शक्यता आहे.

पृथ्वीवर मानवाची उत्पत्ती 14 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली. होमो सेपियन्सची प्रजाती फक्त 300,000 वर्षे जुनी आहे. अशा स्थितीत पृथ्वीवरील जीवनाची उत्पत्ती सुमारे ४ अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.

कोणी तयार केली मूर्ती

म्हैसूरचे रहिवासी अरुण योगीराज यांनी काळ्या ग्रॅनाइटच्या दगडापासून ही सुंदर मूर्ती बनवली आहे.अरुण योगराज हे त्यांच्या कुटुंबातील पाचव्या पिढीतील शिल्पकार आहेत. श्री रामलल्लाची मूर्ती तयार करण्यासाठी त्यांना 6 महिने लागले.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.