नौशेराच्या वाघांनी शत्रूला नेहमीच जशास तसे उत्तर दिले; पंतप्रधान मोदींची सीमेवर जवानांसोबत दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील नौशेरात जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांची तोंडभरून स्तुती केली. (Prime Minister Narendra Modi pays tribute to soldiers who lives in line of duty in Nowshera jammu kashmir)

नौशेराच्या वाघांनी शत्रूला नेहमीच जशास तसे उत्तर दिले; पंतप्रधान मोदींची सीमेवर जवानांसोबत दिवाळी
Narendra Modi
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 1:11 PM

श्रीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील नौशेरात जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांची तोंडभरून स्तुती केली. नौशेराच्या वाघांनी शत्रूंना नेहमीच जशास तसं उत्तर दिलं आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी जवानांची स्तुती केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी आज जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरला पोहोचले. यावेळी त्यांनी जवानांशी हस्तांदोलन केलं. त्यांची विचारपूस केली. तसेच जवानांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. नौशेरा सेक्टरमध्ये त्यांनी शहिदांना श्रद्धांजलीही अर्पण केली. नौशेराचे जवान शूर आहेत. जेव्हा जेव्हा शत्रूने आपल्या भूमीवर पाऊल ठेवलं. तेव्हा तेव्हा त्यांना जवानांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं, असं मोदींनी सांगितलं.

लाल बत्ती आणि सुरक्षेशिवाय सीमेवर

दिल्लीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा निघाला होता. लाल बत्तीशिवाय हा ताफा निघाला होता. त्यांनी सोबत कोणतीही सुरक्षा घेतली नव्हती. मोदींची गाडी ट्रॅफिक सिग्नलवरही थांबली होती. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लाइन ऑफ कंट्रोलवरील जवानांना अॅलर्ट करण्यात आले होते. काश्मीर खोऱ्यातील अनेक भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

एक दिवा जवानांसाठी

आज संध्याकाळी दिवाळीनिमित्त एक दिवा वीरता, शौर्य, पराक्रम, त्याग आणि तपस्याच्या नावावर लावा. देशातील प्रत्येक नागरिक जवानांना दिवा लावून जवानांना शुभेच्छा देईल. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करेल, असं मोदी म्हणाले. तुमच्याकडून ऊर्जा, नवी उमेद आणि नवा विश्वास घेण्यासाठी मी आज पुन्हा आलो आहे. मी केवळ एकटाच तुमच्याकडे आलो नाही. तर 130 कोटी देशवासियांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या काळात येथील ब्रिगेडने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यावर देशाला आजही अभिमान वाटतो, असंही त्यांनी सांगितलं.

सैनिक हो, तुम्हीच माझं कुटुंब

सीमेवरील तैनात जवानच माझं कुटुंब आहे. तुमच्यासोबतच मी प्रत्येक दिवाळी साजरी केली आहे. आधी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून आणि आता पंतप्रधान म्हणून मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करत आहे, असं त्यांनी सांगितलं. आपले जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पाहारा देत असतात. त्यामुळे संपूर्ण देश सुखाने झोपू शकतो. आपले जवान म्हणजे आपलं सुरक्षा कवच आहे. जवानांमुळे देशाची सुरक्षा टिकून आहे आणि देशात शांतता आहे, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

…म्हणून राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याची गरज वाटत नाही; काँग्रेसच्या नेत्याचा युक्तिवाद

नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथला भेट देणार, श्री शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

Abhinandan Vardhaman Promoted: भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना दिला ग्रुप कॅप्टनचा दर्जा

(Prime Minister Narendra Modi pays tribute to soldiers who lives in line of duty in Nowshera jammu kashmir)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.