
भारतीय रेल्वे नेहमीच भारतीय अर्थव्यवस्था आणि कनेक्टिव्हिटीचा कणा राहिली आहे. लोकांना जोडण्याचं आणि दूरपर्यंत माल वाहतूक करण्याचं काम रेल्वेने हमेशा केलं आहे. एका रिपोर्टनुसार, तेजस एक्सप्रेसने या वर्षी ऑक्टोबरपर्यंत 70 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. पहिल्या महिन्यातच एवढी घसघशीत कमाई झाली आहे. तर तिकीटांच्या विक्रीतून 3.70 कोटी रुपये कमावले आहेत. देशातील पहिल्या खासगी ट्रेनची ही आजवरची सर्वात मोठी कमाई आहे. त्यामुळे रेल्वेसाठीचे हे शुभ संकेत असल्याचं मानलं जात आहे.
भारतीय रेल्वेने खानपान आणि पर्यटन कार्पोरेशनच्या लखनऊ-दिल्ली तेजस एक्सप्रेस, रेल्वेच्या 50 रेल्वे स्टेशनला जागतिक मानकांच्या अनुरुप विकसित करण्याच्या योजनेचा हिस्सा आहे. तसेच खासगी प्रवासी ट्रेन ऑपरेटरांना आपल्या नेटवर्कवर 150 ट्रेन चालवण्याची परवानगी देत आहे.
5 ऑक्टोबर रोजी परिचालन सुरू झाल्यानंतर ही ट्रेन सरासरी 80-85 टक्के प्रवाशांसोबत चालली आहे. 5 ऑक्टोबर पासून 28 ऑक्टोबरपर्यंत (ट्रेन आठवड्यातून सहा दिवस चालते, एकूण 21 दिवस) आयआरसीटीसीद्वारे ट्रेन चालवल्याने सुमारे 3 कोटीचा खर्च आला आहे.
रेल्वेची सहायक कंपनी ही अत्याधुनिक ट्रेन चालवण्यासाठी रोज सरासरी सुमारे 14 लाख रुपये खर्च करते. तसेच प्रवाशी भाड्यातून दिवसाला सुमारे 17.50 लाख रुपये कमावते. लखनऊ-दिल्ली मार्गावर तेजस एक्सप्रेसचा पहिला अनुभव आहे. त्यामुळे गैर रेल्वे ऑपरेटर आणि आपली सहायक कंपनी IRCTC द्वारे ट्रेन चालवली जात आहे. IRCTC ने आपल्या प्रवाशांसाठी अनेक प्रकारचे लाभ तयार केले आहेत. संयुक्त भोजन, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा आणि उशिर झाल्यास भरपाई आदींचा यात समावेश आहे.
सरकारने मागच्या महिन्यात खासगी ट्रेन संचालन आणि स्टेनश पुनर्विकास परियोजनांना गती देण्यासाठी सचिवांच्या समूहाला सामील करून घेतले होते. यावेळी एका विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली होती. तथापि या समूहाची पहिली बैठक अजून व्हायची आहे.