सरकारी जॉब मिळाला, १० तारखेला जॉइंट होणार होती, पण अखेर तिने स्वत:ला संपवले

प्रियाच्या तक्रारी आधारे पती शुभम टंडन, सासू गीता सासरे गिरधर टंडन, नणंदा नेहा, प्रियंका, श्वेता यांच्या विरोधात केस दाखल झाली आहे. आरोपींचा शोध सुरु असून सर्वजण फरार झाले आहेत.

सरकारी जॉब मिळाला, १० तारखेला जॉइंट होणार होती, पण अखेर तिने स्वत:ला संपवले
| Updated on: May 27, 2025 | 8:33 PM

पाच महिन्यांपूर्वी तिचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले. नव्या नवरीची हळदही उतरली नव्हती की सरकारी नोकरीचा तिला कॉल आहे. नववधूच्या आनंदाला पारावार उरला नाही. १० जूनला आता नोकरीवर रुजू व्हायचे आणि आपल्या संसारात पतीला हातभार लावायाचे अशी गोड स्वप्नं तिला पडू लागली. परंतू नियतीला हे मान्य नव्हते. सासुरवाडीला हे तिचं सुख बघवलं गेलं नाही. १० जूनला नोकरीवर रुजू होण्यापूर्वी प्रियाने हे आत्मघाती पाऊल उचलले.

या नववधूने सरकारी नोकरीचे जॉईनिंग लेटर समोर असताना मृत्यूला कवठाळले आहे. प्रिया ग्रॅज्युएट होती. तिची निवड बाल विकास सेवा आणि पौष्टीक आहार विभागात तिची निवड झाली होती. १० तारखेला तिला जॉइंट व्हायचे होते, परंतू नवा संसार फुलण्याआधीच तिचे करीयर बहरण्याआधीच संपले. प्रिया हिचे वडील दिनेश दीक्षित यांनी सांगितले की माझी मुलगी सासरी नांदायला मोठी स्वप्नं पाहून गेली होती. तिला संसार करायचा होता. परंतू तिला सुखाने नांदू दिले नाही. तिने अनेकदा माघार घेतली. परंतू त्यांना केवळ पैसे पाहीजे होते. ते सहा लाख रुपये आणि suv कार मागत होते. अखेर तिला एवढे मजबूर केले की तिने हे पाऊल उचलल्याचे ते म्हणाले.

प्रिया हीचा विवाह 10 डिसेंबर 2024 रोजी शुभम टंडन यांच्याशी झाले. शुभम टंडन हा देखील पेशाने शिक्षक आहे. लग्नानंतर काही दिवसातच सासू गीता टंडन, सासरे गिरधर नारायण टंडन आणि नणंद नेहा, प्रियंका आणि सोनी यांनी कमी हुंडा आणल्याचे टोमणे मारायला सुरुवात केली.हळूहळू तिला मारहाण आणि मानसिक त्रास देणे सुरु केले.

6 तास घराबाहेर उभे केले, अखेर पोलीसांनी…

3 फेब्रुवारी रोजी सासरच्यांनी प्रियाला चक्क घरातून हाकलून दिले. ती सहा तास घराच्या बाहेर थंडीत कुडकुडत उभी होती. दरवाजा उघडा म्हणून विनवण्या करीत होती. परंतू घरतल्यांनी दरवाजा उघडला नाही. अखेर तिने हेल्पलाईन 112 वर कॉल करून पोलिसांची मदत मागितली.त्यानंतर तिला घरात प्रवेश दिला. त्यानंतर तिची माहेरी रवानगी करण्यात आली.

13 मे रोजी प्रियाने तिच्या पती आणि सासुरवाडीच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर १७ मे रोजी महिला पोलीसांनी दोन्ही पक्षांना समज देण्यासाठी बोलावले. यावेळी प्रियाचा पती शुभम वकीलांची टीम घेऊन पोलिस ठाण्यात आला. पोलिस दूर होताच त्याने प्रियाचा भाऊ आणि वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तिचा भाऊ पीयूष याने सांगितले.

प्रिया वडिलांचा आरोप?

शुभम प्रियाला मारहाण करायचा आणि नंतर हसायला सांगायचा. तिचे जबरदस्ती फोटो काढायचा आणि तिला मानसिक त्रास द्यायचा असे प्रियाचे वडील दिनेश दीक्षित यांनी सांगितले.आपल्याला १ फेब्रुवारीला पती – सासरे आणि सासुने उशीने तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. मी माझ्या माहेरच्या माणासांच्या सुरक्षेसाठी जीव देत आहे अशी दोन पानी चिट्टी प्रियाने लिहून ठेवली आहे.

राजधानी लखनऊ येथील ठाकुरगंज परिसरात हा प्रकार घटना घडली आहे. शुभम टंडन हा देखील बाराबंकीच्या फतेह सराय प्राथमिक विद्यालयात शिक्षक आहे. त्याची दिवंगत वधू प्रियाला देखील सरकारी नोकरी लागली होती. तरीही अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.