AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर 7 दिवसात पतीला दिले सोडून, दीराशी जुळली रेशीमगाठ, अखेर पतीने घेतला निर्णय

दीर आणि वहिनी यांचं नातं एखाद्या आई आणि मुलांप्रमाणे असते. ते एकमेकांचे भाऊ बहिण वा मित्रांप्रमाणे वागत असतात.. काही वेळा मात्र या नात्यात सीमा ओलांडली जाते मग....

लग्नानंतर 7 दिवसात पतीला दिले सोडून, दीराशी जुळली रेशीमगाठ, अखेर पतीने घेतला निर्णय
Follow us
| Updated on: May 24, 2025 | 6:46 PM

दीर आणि वहिनी यांचं नातं तर भाऊ बहिण किंवा मित्रांप्रमाणे असते. काही जणांना या नात्याला काळीमा फासतात आणि नात्याच्या मर्यादा ओलांडतात. असेच एक प्रकरण घडले आहे. येथे एका महिलेचे लग्न होऊन ती सासरी आली.त्यानंतर सात दिवसात तिचे पतीशी बिनसले. आणि तिला आता दीरच आवडू लागला. दीराचेही वहिनीशी प्रेम जुळले.मग दोघेही आमचं लग्न लावून द्या असा हट्ट करु लागले.

या दीर आणि वहिनीच्या अनोख्या लव्ह स्टोरीचा पत्ता जेव्हा घरातल्या ज्येष्ठांना लागला तेव्हा मोठा हंगामा झाला. दीर आणि वहिनी दोन्हीही हट्टाला पेटले. एकमेकांना सोडायला तयार होईनात. त्यामुळे गावात ही गोष्ट चर्चेची झाली. नंतर त्यांचे प्रेम पाहून मोठ्या भावाने एक मोठा निर्णय घेतला.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरातील हंसवर ठाणे क्षेत्रातील एका गावचे आहे. ५ मे रोजी या गावात राहणाऱ्या एका युवकाचे लग्न गावापासून केवळ तीन किमीवर असलेल्या गावातील एका युवतीशी झाले. लग्न मोठ्या धुमधडाक्यात झाले. त्यानंतर नव दाम्पत्यांचा संसार सुरु झाला. त्यानंतर नववधूची नजर दीरावर पडली. आणि लग्नाच्या सात दिवसातच दोघांमध्ये जवळीक वाढली. लग्नाच्या एका आठवड्यातच विवाहीता तिच्या माहेरी गेली. तेथे गेल्यानंतर तिचा पतीमधील इंटरेस्ट संपला.

विवाहितेने घरच्यांना सांगितले की आपण आता दीरासोबत राहणार. तिने अशी इच्छा बोलून दाखवली आणि दोन्ही कुटुंबात महाभारत पेटले.अखेर गावात पंचायत बोलवण्यात आली. दोन्ही बाजूंनी आपली बाजू मांडली. दीराला चौकशीला बोलावले तर तो म्हणाला आता जगेन तर वहिनी सोबत आणि मरेन तर वहीणीच्यासोबतच…वाद वाढल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. तेथे सर्वासमोर वधूने मी दीरासोबतच खूश असून मला पती सोबत नांदायचे नाही असे सांगितले. दीर आणि वहिनीने एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याने पोलिसही चक्रावले. हा कौटुंबिक मामला असल्याने दोन्ही सज्ञान असल्याने पोलिसांनी देखील हस्तक्षेप करण्यास नकार दिला.आता

लहान मुलाची सून बनून पुन्हा गृहप्रवेश …

सर्व सामाजिक रितीरिवाज तोडून दीर आणि वहिनी एकमेकांचे झाले. कुटुंबानेही मग हार मानत दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. जेथे सात दिवसांपूर्वी मोठ्या मुलाची पत्नी बनून गृहप्रवेश केला तेथेच आता लहान मुलाची वधू म्हणून तिने गृहप्रवेश केला.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.