Priyanka Gandhi: “तुझे काका चोर आहेत”, असे म्हणताच प्रियंका गांधी यांनी कुणाच्या लगावली कानशि‍लात, तो किस्सा काय?

Priyanaka Gandhi on Sanjay Gandhi: सध्या सोनिया गांधी यांच्या बिलाँगिंगः ए जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरू आहे. गांधी कुटुंब गेल्या काही वर्षातील आठवणीत रमले आहे. काही भावनात्मक, आव्हानात्मक प्रसंग समोर येत आहे. असाच एक किस्सा खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी शेअर केला आहे.

Priyanka Gandhi: तुझे काका चोर आहेत, असे म्हणताच प्रियंका गांधी यांनी कुणाच्या लगावली कानशि‍लात, तो किस्सा काय?
प्रियंका गांधी यांनी कुणाच्या लगावली कानशि‍लात?
| Updated on: Nov 25, 2026 | 9:36 AM

Priyanaka Gandhi on Sanjay Gandhi: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया यांची आत्मकथा बिलाँगिंगः ए जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पुस्तकावर चर्चासत्र होत आहेत. अशाच एका मुलाखतीत काल राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणण्यासाठीच त्यांची सुरक्षा हटवल्याचा दावा केला. तर खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी आठवणींच्या पेटाऱ्यातून एक झणझणीत किस्सा सर्वांसमोर मांडला. काकाला चोर म्हणणाऱ्याला चापट लगावल्याची माहिती त्यांनी एका कार्यक्रमात दिली.

बालपणीच्या आठवणींना उजाळा

Loading...

१९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकीतील पराभव आणि आणीबाणीनंतरचा काळ नेहरू आणि गांधी कुटुंबियांसाठी आव्हानात्मक होता. तसाच तो प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी सुद्धा कठीण काळ होता. या काळातील उलथापालथीचे परिणाम त्यांच्या बालमनावरही उमटत होते. राजकीय घाडमोडींचा परिणाम शालेय जीवनातही समोर येत होता. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी त्या तणावपूर्ण काळातील आठवणींना उजाळा दिला.

शाळेत विद्यार्थ्याला लगावली कानशिलात

‘व्हॉट माँ लेफ्ट आऊट ऑफ हर बुक’ या नावाने एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात प्रियंका गांधी यांनी जुना किस्सा समोर आणला आहे. १९७७ मधील निवडणुकीत इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचा पराभव झाला होता. वातावरण तणावपूर्ण होते. शाळेत गेल्यावर प्रियंका गांधी यांना या सर्व प्रकाराचा सामना करावा लागत होता. शाळेतील एका मुलाने एक टोमणा मारला. त्याचा प्रियंका गांधी यांना फार राग आला. तुझे काका चोर आहेत, म्हणून ते तुरुंगात आहेत, असे त्याने म्हणताच, प्रियंका गांधी यांनी त्या विद्यार्थ्याच्या कानशि‍लात लगावली होती, हा किस्सा त्यांनी सांगितला. झालेल्या प्रकारामुळे शिक्षक त्यांच्यावर फार रागवले होते. निवडणुकीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांच्या बाकावर कोणीच शेजारी बसले नाही. वर्गातील मित्र-मैत्रिणी त्यांच्याशी बोलणं टाळत असल्याची कटू आठवण त्यांनी त्यांनी सांगितली.

वाढदिवसाच्या पार्टीला केवळ एक मित्र हजर

याच काळात त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी शाळेतील 32 मुलांना वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले. वातावरण निवळावे आणि मैत्री वाढावी हा त्यामागील हेतू होता. पण ठरलेल्या वेळवर केवळ एक वर्गमित्र आला. थोडावेळ वाट पाहिली, तरी कोणी आले नाही. राहुल गांधी यांनी सांगितले की हा मित्र अजूनही नियमित भेटतो आणि त्याच्याशी असलेली मैत्री आजही कायम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us