AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीजेपीचे आंदोलन पुन्हा जंतरमंतरवर, दिल्लीत मेट्रो सेवा सुरु, पोलिस अलर्ट मोडवर..

CJP Protest Delhi : सीजेपीने 10 ऑक्टोबर रोजी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन पुकारले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी थेट कारवाई करत ताब्यात घेतले. आज सलग दुसऱ्या दिवशीही सीजेपीने मोर्चाची घोषणा केली. दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला.

सीजेपीचे आंदोलन पुन्हा जंतरमंतरवर, दिल्लीत मेट्रो सेवा सुरु, पोलिस अलर्ट मोडवर..
Delhi CJP Movement
| Updated on: Oct 11, 2026 | 8:19 AM
Share

सीजेपीकडून आज सलग दुसऱ्या दिवशी आंदोलनाची घोषणा करण्यात आली. सीजेपीचे अध्यक्ष आणि महत्वाच्या नेत्यांना दिल्ली विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतले. अभिजीत दिपके आणि त्यांच्यासोबतचे इतर सहकारी नक्की कुठे आहेत, हे कोणाला माहिती नाही. सीपेजीच्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केली. अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले तर दुसरीकडे त्यांच्या आजीने जगाचा निरोप घेतला. अभिजीत दिपके याच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न कुटुंबियांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पुकारले. त्यांच्या या आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिस अलर्ट मोडवर आहे. जंतर मंतवरवर मोठा फाैजफाटा बघायला मिळतोय. अनेक रेल्वे दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या रद्द करण्यात आल्यात. 10 ऑक्टोबर रोजी सीजेपीने आंदोलन पुकारले होते. आज दुसरा दिवस आहे.

दिल्लीत आजही सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली. अनेक ठिकाणी पोलिसांकडून बॅरिकेटिंग करण्यात आलंय. मंडी हाऊस परिसरातील रस्त्यावर बॅरिकेटिंग केली असून पोलिस सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. दिल्ली पोलीस, RAF, CRPF जवान तैनात आहेत. काल मेट्रोसेवा दिल्लीत बंद होती. आज मेट्रो सुरू करण्यात आली. जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका सीजेपीने घेतली.

आज सकाळी पुन्हा 10 वाजता सीजेपी जंतर मंतरवर मोर्चा काढणार आहे. सीजेपीच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरीही आता आंदोलनाची जबाबदारी ही अजिंक्य शिंदेंच्या खांद्यावर आहे. मोठ्या संख्येत पोलिस या परिसरात तैनात आहेत. सीजेपीच्या आंदोलनाने दिल्लीत कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आवाहन आहे. यासोबतच अभिजीत दिपके आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या सुटकेसाठी सीजेपीचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. पोलिसांनी काल 7 हजारांहून अधिक लोकांना ताब्यात घेतल्याचे कळतंय.

हुकूमशाहीला घाबरणार नसल्याचे अजिंक्य शिंदे यांनी स्पष्ट केले. सीजेपीच्या या आंदोलनाची चर्चा जगभरात सुरू आहे. इंडिया आघाडी देखील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहे. खासदारांनीही मोर्चा काढला होता. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात सीजेपीने मोठे आंदोलन पुकारले. या आंदोलनात देशभरातील विद्यार्थी सहभागी झाले. शेवटी सरकारला सीजेपीची मागणी मान्य करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे