मोठी बातमी! पाकिस्तानचे दोन तुकडे होणार? 15 जुलैला पाकच्या संसदभवनातून होणार सर्वात मोठी घोषणा
पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. पीओकेमधील आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. पीओकेला छावणीचं स्वरुप आलं असून, तब्बल 17 हजार सैनिक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत, या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमेटी (JAAC) या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे. 15 जुलै रोजी आम्ही पाकिस्तानच्या संसद भवनातून स्वातंत्र्याची घोषणा करू, असं जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमेटीने म्हटलं आहे. पाकिस्तानी सैन्याने ताबडतोब पाक व्याप्त काश्मीर सोडून निघून जावे, अशी मागणी देखील पीओकेच्या स्थानिक नेत्यांकडून होत आहे. पाकिस्तानच्या सैन्याकडून पाक व्याप्त काश्मीरमधील काही भाग हे दहशतवादी क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहेत, याचा देखील स्थानिक नेत्यांकडून निषेध करण्यात आला आहे.
पाक व्याप्त काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. हजारो लोक ईदगाह मैदानावर एकत्र जमले आहेत. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असून, स्थानिक नेते आणि नागरिकांकडून पाकिस्तान सरकारकडून सुरू असलेला अत्याचार दाखवण्यासाठी विदेशी मीडियाला आमंत्रित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी पाक व्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधात एक आंदोलन सुरू होतं, या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर असीम मुनीर यांच्या आदेशाने पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता, या गोळीबारात तब्बल 30 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पीओकेमधील आंदोलन अधिकच पेटलं. येथील स्थानिक नेत्यांनी या हत्याकांडाची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडशी केली आहे.
27 जुलै रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यापूर्वीच आमच्या 38-सूत्रीय आर्थिक आणि संवैधानिक मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी पाकव्याप्त काश्मीरमधील नेते तसेच जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमेटीकडून करण्यात आली आहे. दरम्यान 15 जुलै रोजी आम्ही पाकिस्तानच्या संसद भवनातून स्वातंत्र्याची घोषणा करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पीओकेला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे, तब्बल 17 हजार सैनिक सध्या स्थितीमध्ये पीओकेमध्ये तैनात आहेत. आंदोनाला आता हिंसक वळण लागलं आहे. पाकिस्तानी सैन्यांकडून स्थानिक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. मात्र येथील नागरिक देखील आता मैदानात उतरले असून, आम्ही माघार घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.