AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bus Accident : भीषण अपघात, पुलावरुन थेट नाल्यात कोसळली बस, आठ प्रवाशांचा मृत्यू, चिंताजनक प्रवाशांची संख्या जास्त

Bus Accident : एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. बस पुलावरुन थेट नाल्यात कोसळली. बसमध्ये किमान 50 प्रवासी असल्याची माहिती आहे.

Bus Accident : भीषण अपघात, पुलावरुन थेट नाल्यात कोसळली बस, आठ प्रवाशांचा मृत्यू, चिंताजनक प्रवाशांची संख्या जास्त
Bus Accident
| Updated on: Dec 27, 2024 | 6:05 PM
Share

एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस पुलावरुन थेट नाल्यात कोसळली. या बसमध्ये किमान 50 प्रवासी असल्याची माहिती आहे. पंजाबच्या बठिंडा येथे हा भीषण अपघात झाला आहे. बठिंडाच्या जीवन सिंह वाला येथे हा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस थेट पुलावरुन नाल्यात कोसळली. प्रशासन आणि स्थानिक लोकांनी बसच्या काचा तोडून प्रवाशांना बाहेर काढलं.

बठिंडा-शार्दुलगढ़ मार्गावर या खासगी कंपनीच्या प्रवासी बसची वाहतूक सुरु होती. पुलावरुन बस खाली कोसळली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय. बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. हा अपघात कसा झाला, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. बठिंडाचे एसएसपी अवनीत कोंडल दुर्घटनास्थळी पोहोचले आहेत.

किती प्रवाशांची प्रकृती चिंताजनक?

अपघाताच्यावेळी पाऊस सुरु असावा, त्याचवेळी बसचा वेग जास्त होता, त्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. नेमका अपघात कसा झाला, हे अजून समजू शकलेलं नाही. बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. 24 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

‘ऐकून मी स्तब्ध’

तलवंडी साबोमधील आपचे आमदार बलजिंदर कौर यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. या दुर्देवी अपघाताबद्दल ऐकून मी स्तब्ध आहे, असं ते म्हणाले. बलजिंदर कौर म्हणाले की, “माझं डीसी शौकत अहमद पारे यांच्याशी फोनवरुन बोलणं झालय. जवळपास सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आलय”

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?