AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab Flood: 9 जिल्ह्यांमध्ये पूर, 1312 गावे पाण्याखाली, 30 जणांचा मृत्यू; हा उडता नव्हे बुडता पंजाब

उत्तर भारतातील डोंगराळ प्रदेशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पंजाबमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. 9 प्रमुख जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. या पुरामुळे राज्यातील 1300 गावे पाण्याखाली गेली आहेत.

Punjab Flood: 9 जिल्ह्यांमध्ये पूर, 1312 गावे पाण्याखाली, 30 जणांचा मृत्यू; हा उडता नव्हे बुडता पंजाब
punjab flood
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 02, 2025 | 10:53 PM
Share

उत्तर भारतातील डोंगराळ प्रदेशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पंजाबमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. 9 प्रमुख जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. या पुरामुळे राज्यातील 1300 गावे पाण्याखाली गेली आहेत, तसेच वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत, शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

पंजाबमधील तरणकरण, अजनाला, पठाणकोट, फाजिल्का, अमृतसर या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसते. उत्तर भारतातील डोंगराळ भागात सतत पाऊस पडत असल्यामुळे पंजाबमधील सतलज, बियास आणि रावी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी रहिवासी भागात शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.

या पुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत पंजाबमध्ये पुराच्या संबंधित घटनांमुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक मुके प्राणी पुरात वाहून गेले आहेत. अनेकांच्या डोळ्यासमोर जनावरे वाहून गेली मात्र ते त्यांना वाचवू शकले नाही.

मानसामध्ये शेतीचे मोठे नुकसान

पंजाबमधील या पुरामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 94061 हेक्टरवरील पिकांना पुराचा फटका बसला आहे. मानसा येथे सर्वाधिक 17005 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर कपूरथळा येथे 14934 हेक्टर, तरणतारन 11883 हेक्टर, फिरोजपूर 11232 हेक्टर, पठाणकोट 2442 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पंजाबमध्ये यंदा 180 लाख मेट्रिक टन भात उत्पादनाचे लक्ष्य ठेवले होते, मात्र आता या पुरामुळे हा आकडा गाठणे जवळपास अशक्य झाले आहे.

प्रभावित लोकांसाठी छावण्यांची उभारणी

पुराने प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पंजाब सरकाने 129 मदत छावण्या सुरु केल्या आहेत. याद्वारे लोकांना मदत केली जात आहे. तसेच पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी 114 बोटी आणि एक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफची 20 पथके बचावकार्यात व्यस्त आहेत. तसेच हवाई दल, नौदल आणि लष्कराचे कर्मचारीही बचावकार्य करत आहेत.

Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?