AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच वेळा मुख्यमंत्री पद भूषविणारा पंजाबचा बडा नेता हरपला, प्रकाश सिंह बादल यांचं निधन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्यावर मोहालीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.

पाच वेळा मुख्यमंत्री पद भूषविणारा पंजाबचा बडा नेता हरपला, प्रकाश सिंह बादल यांचं निधन
फोटो सौजन्य : सोशल मीडिया
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 25, 2023 | 9:57 PM
Share

चंदिगढ : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्यावर मोहालीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पंजाबमध्ये शोककळा पसरली आहे. प्रकाश सिंह बादल हे अकाली दलाचे वरिष्ठ नेते होते. तसेच ते तब्बल पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर बादल हे त्यांचे पुत्र आहेत. प्रकाश सिंह बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 ला पंजाबमधील एका छोट्याशा गावात जाट शीख परिवारात झाला होता. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण पंजाबमध्ये शोक व्यक्त केला जातोय.

प्रकाश सिंह बादल यांना श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मोहाली येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्यांच्यावर गेल्या आठवड्याभरापासून फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत होते. डॉक्टरांची पूर्ण टीम त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी काम करत होती. पण सोमवारी त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलेली. त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टरांचं कडक लक्ष होतं. पण त्यानंतर आज त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आलीय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या आठवड्यात प्रकाश सिंह बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच त्यांनी बादल यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. प्रकाश सिंह बादल यांची गेल्यावर्षी जून महिन्यातही प्रकृती बिघडली होती. त्यांना तेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

राजनाथ शिंह यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना प्रकाश सिंह बादल यांच्या निधन झाल्याचं वृत्त समजल्यानंतर त्यांनी ट्विटवर बादल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “प्रकाश सिंह बादल हे एक राजकारणातील दिग्गज नेते होते. त्यांनी अनेक दशकांपर्यंत पंजाबच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शेतकरी आणि समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय”, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली व्यक्त केली. बादल यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण पंजाबमधून शोक व्यक्त केला जातोय.

Follow Us
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...