Tajinder Bagga Arrested: पंजाब पोलिसांनी तेजिंदर बग्गाला अटक केल्यानंतर दिल्लीत अपहरणाचा गुन्हा दाखल, पोलिसांचा ताफाही हरियाणामध्ये आडवला

बग्गा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी द काश्मिर फाईल चित्रपटालवरून दिलेल्या प्रतिक्रीये विरोधात ट्विटरवर वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतरट बग्गा हे आपच्या रडावर आले होते. मात्र त्याच्या आधीच पंजाब पोलिसांनी यांच्यावर प्रक्षोभक भाषणे करणे, धार्मिक उन्माद पसरवणे आणि गुन्हेगारी धमकी देण्यावरून गुन्ही दाखल केला होता.

Tajinder Bagga Arrested: पंजाब पोलिसांनी तेजिंदर बग्गाला अटक केल्यानंतर दिल्लीत अपहरणाचा गुन्हा दाखल, पोलिसांचा ताफाही हरियाणामध्ये आडवला
भारतीय जनता पक्षाचे नेते तेजिंदर बग्गा
Image Credit source: tv9
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 06, 2022 | 2:18 PM

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते तेजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून अटक केली. त्यानंतर मात्र पंजाब पोलिसांवरच (Punjab Police) दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केल्याचे समोर आले आहे. तसेच बग्गा यांना दिल्लीमधून मोहालीला नेत असताना पोलिसांचा ताफा हरियाणातील कुरूक्षेत्रात आडविण्यात आला. तर जे पंजाब पोलिस बग्गा यांना नेण्यासाठी आले होते आता च्यांनाच प्रश्न विचारले जात आहेत. पंजाब पोलिसांची चौकशी कुरूक्षेत्रात तेथे सुरू आहे. तर यावर प्रतिक्रीया देताना पंजाब पोलिसांनी म्हटले आहे की, हे सर्व दिल्ली पोलिस करत आहेत. तर मागील काही दिवसांच्या आधीही पंजाब पोलिसांची टीम बग्गा यांच्या घरी गेली होती. तर बग्गा यांच्यावर प्रक्षोभक भाषणे करणे, धार्मिक उन्माद पसरवणे आणि गुन्हेगारी धमकी देणे असे आरोप आहेत. तसेच त्यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पतियाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पंजाब पोलिसच बरोबर

यावेळी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, याबाबत आम्ही माहिती घेतली आहे. बग्गा यांचे फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट बघा म्हणजे स्पष्ट दिसेल. ते विषारी आणि द्वेषयुक्त भाषेचा वापर करतात. तर बग्गा यांनी २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात एका वकिलालाही मारलं होतं. तर रामलिला मैदानातील कार्यक्रमात ही दंगा केला होता. तर त्यांच्यावर २०१४ मध्ये बग्गा यांच्यावर घरात घुसून मारहान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर तुघलक रोड येथे लोकांनीच बग्गा यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्याप्रकरणात न्यायालयात आरोप सिद्ध झाले आहेत. पटियाळा न्यायालयाने देखील त्यांना दोषी ठरवले आहे. तर एखाद्या नावारूपाला आलेल्या गुन्हेगारासारखेच बग्गा यांचे काम आहे. तर पंजाबमध्ये साप्रदायिक हिंसा भडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्याच प्रकरणी न्यायालयाने संमंज बजावला होता. मात्र त्यांनी घेतला नाही.

पंजाब पोलिस निष्पक्ष तपास करत आहेत

पंजाब पोलिस या प्रकरणी सारखे बग्गा यांच्या घरी गेली. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. पंजाब पोलिस निष्पक्ष तपास करत आहेत. या कारवाई विरोधात उच्चन्यायालयातही दाद मागण्यात आली होती मात्र तेथेही काहीच झालेले नाही. तर भाजप करत असेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. कारण भाजप राज्याच्या यंत्रणांचा चुकीचा वापर करते. मात्र पंजाब पोलिस सारे नियम पाळून आपले काम करत आहे.

भाजपचा आपवर आरोप

तर बग्गा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईला दिल्ली भाजपने विरोध केला आहे. दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा यांनी दावा केला की, बग्गा यांच्या दिल्लीतील घरी सुमारे 50 पोलिसांनी घुसून त्यांना अटक केली. मात्र बग्गा अशा गोष्टींना घाबरत नाहीत. दरम्यान बाजप कार्यकर्त्यांना जनकपूरी पोलिस स्टेशनच्या बाहेर जोरदार आंदोलन केले. तर दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली पोलिसांविरोधात नारेबाजी केली.

पंजाब पाठवणार फआयआर ची कॉपी

पंजाब पोलिसांकडून बग्गा प्रकरणी हरियाणा पोलिसांच्या DGP नां FIR ची कॉपी पाठवली जाणार आहे. तसेच करण्यात आलेली कारवाई ही अपहरण असू शकत नाही असेही सांगण्यात येणार असून विनाकारण हरियाणा पोलिस दिल्ली पोलिसांच्या कामात अडथळा आनत आहे.

हे सुद्धा वाचा

पंजाब पोलिसांनी वादग्रस्त विधानावर दाखल केली FIR

याच्याआधीच बग्गा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी द काश्मिर फाईल चित्रपटालवरून दिलेल्या प्रतिक्रीये विरोधात ट्विटरवर वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतरट बग्गा हे आपच्या रडावर आले होते. मात्र त्याच्या आधीच पंजाब पोलिसांनी यांच्यावर प्रक्षोभक भाषणे करणे, धार्मिक उन्माद पसरवणे आणि गुन्हेगारी धमकी देण्यावरून गुन्ही दाखल केला होता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें