सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी घेतला हा धक्कादायक निर्णय; मुलाची हत्या होऊनही न्याय मिळाला नाही….

माझ्या मुलाची हत्या होऊन कित्येक दिवस उलटूनही न्याय मिळाला नाही म्हणून आता आम्ही देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी घेतला हा धक्कादायक निर्णय;  मुलाची हत्या होऊनही न्याय मिळाला नाही....
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 6:31 PM

चंदीगडः पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या झाल्यानंतर त्या संदर्भातील अनेक घटना समोर येत होत्या. त्यातच आता न्याय मिळत नसल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असून त्यांनी भारत सोडून जाणार असल्याचे मुसेवालाच्या वडिलांचे बलकौर सिंह यांचे वक्तव्य समोर आले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी अद्याप आम्हाला अजून न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आपण भारत सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच त्याच्या वडिलांनीही या प्रकरणातील एफआयआर मागे घेणार असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सांगितले.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी त्याचे वडिल बलकौर सिंह म्हणाले की, हत्या होऊन कित्येक दिवस उलटून गेले आहेत. अजून आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत मात्र आता 25 नोव्हेंबरनंतर मात्र आपण आपल्या कुटुंबासह भारत सोडणार आहे. तसेच आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी दाखल केलेला एफआयआरही मागे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या मुलाची हत्या झाल्यानंतर पोलीस प्रशासनही आपल्याला न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत.

सिद्धू मूसेवालाची हत्या ही माझ्या मुलाची हत्या नियोजन करुन करण्यात आली होती. तर पोलीस मात्र ही घटना टोळीयुद्धाची असल्याचे सांगण्यात गर्क आहेत.

माझ्या मुलाच्या हत्या संदर्भात समस्या आणि अडचणी सांगण्यासाठी मी पोलीस महानिरीक्षकांकडे वेळ मागितला आहे. त्यासाठी मी महिनाभर वाट बघणार आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करीन. त्यानंतर एफआयआर मागे घेईन आणि भारत सोडून निघून जाईन असं त्यांनी स्पष्ट सांगितले.

सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणी चंदीगड पोलिसांनी सांगितले होते की, त्यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील एकाला अटक केली आहे. त्यानंतर चंदीगड पोलिसांनी त्याबाबत एक पत्रकही जाहीर केले होते. त्यामध्ये अटक करण्यात आलेल्या मोहित भारद्वाज ( वय 32) याच्याकडून अमेरिकेन बनावटीची पिस्तूल ताब्यात घेतली आहे.

तर मोहित हा गुंड दीपक टिनूच्या जवळचाही होता असंही त्यांनी सांगितले. त्यानंतर टिनू मानसा पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता, पण नंतर त्याला दिल्ली पोलिसांनी अटकही केली होती.

टिनू हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील आरोपी असून मोहितने गुंड संपत नेहरासोबत राहून बऱ्याच गोष्टी त्याने शिकून घेतल्या असल्याचेही पोलिसांनी सांगितले होते.

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.