Sidhu Moosewala Murder Case: सिद्धू मुसेवाला हत्येचा गोल्डी ब्रार ‘मास्टरमाईंड’; पंजाब पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

सिद्धू मुसेवालाची हत्या झाल्यानंतर आरोपींनी हत्यारे मानसापासून 1 किमीच्या परिघात ठेवली होती, असेही पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपी गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी सिग्नल अॅपवरून बोलत होते असंही पोलिसांनी म्हटले आहे.

Sidhu Moosewala Murder Case: सिद्धू मुसेवाला हत्येचा गोल्डी ब्रार 'मास्टरमाईंड'; पंजाब पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
महादेव कांबळे

|

Aug 31, 2022 | 11:35 AM

नवी दिल्लीः पंजाबच्या मानसा पोलिसांकडून पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून (Punjabi singer Sidhu Musewala Murder) प्रकरणी आरोपपत्र सादर (Charge sheet submitted) करण्यात आले आहे. मुसेवाला खून प्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रार (Canada Gangster Goldie Brar) हा मूसवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड होता. घटनेनंतर आरोपींनी हत्यारे मानसापासून 1 किलोमीटरच्या परिघात ठेवली असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपी गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी त्यांचे सिग्नल ॲपवरून बोलणे होत होते असंही त्या आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे. सिद्धू मुसेवाला याची 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येप्रकरणी अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, मात्र आता मुख्य सूत्रधारांची माहिती मिळाली असल्याचे पंजाब पोलिसांकडून सांगण्यात आले.

मूसवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रानुसार, गोल्डी ब्रार हीच व्यक्ती होती ज्याने प्रत्यक्षपणे पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचा कट रचला आणि त्याची हत्याही घडवून आणली होती.

सुरक्षा व्यवस्था काढली

पंजाब पोलिसांच्या आरोपपत्रात असं म्हटलं आहे की, पंजाब सरकारकडून मुसेवालाला सुरक्षा नसल्याची जाहीर होताच, गोल्डी ब्रारकडून मे महिन्यामध्येच शूटरना मुसेवाला लवकरात लवकर संपवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सुरक्षा कपात केल्यानंतर हत्येचा कट

पंजाब पोलिसांनी जे आरोपपत्र दाखल केले आहे, त्यामध्ये नमूद केले आहे की, 28 मे रोजी गायक मुसेवालाच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यानंतर कॅनडामध्ये राहणाऱ्या गुंडाकडून त्याची हत्या करण्यासाठी निवडलेलेल्या शार्प शूटरना पंजाबमधील मानसा जिल्ह्यात जाऊन मूसवालाची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. त्यानंतर मानसा येथे जाऊन 29 मे रोजी त्यांना शस्त्रे आणि कार देण्यात आली. शार्पशूटरना हत्यारे आणि कार देण्यात आल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईकडून इतर सगळी माहिती पुरवली गेली असल्याचेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी घेतल्यानंतर काही दिवसांनी इंटरपोलने ब्रारविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही जाहीर करण्यात आली होती.

पंजाब पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरूच

मूसेवाला हत्याकांडाबद्दल पंजाब पोलिसांकडून सांगण्यात आले की, त्यांनी अझरबैजानमधील गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपीचा शोध घेतला आहे. याबद्दल पोलीस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव म्हणाले की, केंद्रीय एजन्सींनी आरोपी सचिन थापन बिश्नोईला शोधण्यात राज्य पोलिसांना मदत केली असून त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बनावट पासपोर्ट वापरून पलायन

मूसवालाच्या हत्येपूर्वी सचिन आणि आणखी एक आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई बनावट पासपोर्ट वापरून देशातून पळून गेला होता. याप्रकरणी पोलीस महासंचालकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा आणखी एक सदस्य गोल्डी ब्रारच्या संपर्कात होता, ज्याने गायकाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. तोच पहिल्यांदा दुबईला पळून गेला होता. भारत सरकार आणि केंद्रीय यंत्रणांच्या पाठिंब्याने तो अझरबैजानमध्ये असल्याची माहिती पोलिसांना सांगण्यात आली आहे.या हत्याकांड प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असून या प्रकरणातील सर्व आरोपींना भारतात आणले जाईल असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें