AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raghuram Rajan : ट्रम्प यांच्या टॅरिफवर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची पहिली प्रतिक्रिया, सरकारला काय सल्ला दिला?

Raghuram Rajan : भारत सध्या अमेरिकेच्या टॅरिफ संकटाचा सामना करतोय. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी केंद्र सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे. रघुराम राजन हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आहेत. त्यांनी सरकारला रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणाचा फेरविचार करण्याचाही सल्ला दिला आहे.

Raghuram Rajan : ट्रम्प यांच्या टॅरिफवर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची पहिली प्रतिक्रिया, सरकारला काय सल्ला दिला?
Raghuram Rajan
| Updated on: Aug 28, 2025 | 12:45 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयावर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांचा 50 टक्के टॅरिफचा निर्णय हा भारत-अमेरिका संबंधांसाठी झटका आहे. भारत सरकारसाठी हा जागं होण्याचा कॉल आहे असं रघुराम राजन यांना वाटतं. बुधवारपासून अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय सामानावर 50 टक्के टॅरिफ लागू झाला आहे. जगातील दोन मोठ्या लोकशाही आणि अलीकडच्या दशकात रणनितीक भागीदार बनलेल्या दोन्ही देशांच्या संबंधांसाठी हा एक धक्का आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, म्हणून ट्रम्प यांनी दंडात्मक अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावलाय. त्याशिवाय आधीपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तुंवर 25 टक्के टॅरिफ आहेच.

“अमेरिकेच्या या निर्णयाचा छोटे शेतकरी, कपडा उत्पादकांना फटका बसेल. यामुळे अनेकांचे रोजगार धोक्यात आले असून हे अस्वस्थ करणारं आहे” असं मत रघुराम राजन यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मांडलं. “सध्याच्या जागतिक स्थितीत व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक शक्तीचा शस्त्रासारखा वापर केला जात आहे. भारताने याचा काळजीपूर्वक सामना केला पाहिजे” असं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं.

या उद्योगांना ट्रम्प यांच्या टॅरिफचा मोठ्या प्रमाणात फटका

“हा वेक अप कॉल म्हणजे जागं होण्याचा कॉल आहे. कुठल्या एका देशावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहू नका. अमेरिकेसोबत पूर्वेकडच्या देशांकडे, युरोप, आफ्रिकेकडे बघा. 8 ते 8.5 टक्के विकास दर गाठण्यासाठी सुधारणा करा, त्यामुळे आपल्या युवा पिढीला रोजगार मिळू शकेल” असं राजन म्हणाले. भारतातून वस्त्र, रत्न, दागिने, बूट-चप्पल, क्रीडा साहित्य, फर्निचर आणि केमिकल्सची मोठ्या प्रमाणात अमेरिकेत निर्यात होते. या उद्योगांना ट्रम्प यांच्या टॅरिफचा मोठ्या प्रमाणात फटका बसेल.

रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणाचा फेरविचार करण्याचा सल्ला

ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे छोटे निर्यातदार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांना धोका आहे. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसू शकतो. भारताने रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणाचा सुद्धा फेरविचार करावा असा सल्ला रघुराम राजन यांनी दिला आहे. “यामुळे कोणाला फायदा होतोय आणि कोणाचं नुकसान याचा विचार केला पाहिजे. शुद्धीकरण करणाऱ्यांना यातून बराच पैसा मिळतोय. पण निर्यातदारांना त्याची किंमत चुकवावी लागत आहे. फायदा मोठ्या प्रमाणात नसेल, तर खरेदीच्या धोरणाचा आपण फेरविचार केला पाहिजे” असं रघुराम राजन म्हणाले.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?