एक इंचही मागे हटू नका, मी तुमच्यासोबत, राहुल गांधींचं शेतकऱ्यांना आवाहन

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली (Rahul Gandhi appeal people to not go back).

एक इंचही मागे हटू नका, मी तुमच्यासोबत, राहुल गांधींचं शेतकऱ्यांना आवाहन

नवी दिल्ली : “आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. तुम्ही एक इंचही मागे हटू नका. कारण यामागे तुमचं भविष्य अवलंबून आहे. हे जे 5-10 लोकं तुमचं भविष्य चोरी करु पाहत आहेत, त्यांना ते चोरु देऊ नका. आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करु”, असं आश्वासन आणि आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना केलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर सडकून टीका केली (Rahul Gandhi appeal people to not go back).

“शेतकरी आंदोलनासोबत काय सुरु आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरंतर नव्या कृषी कायद्यांमुळे काय नुकसान होईल, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समित्या संपतील, MSP नष्ट होईल. खरंतर सरकार शेतकऱ्यांचा जगण्याचा अधिकार हिसकावून घेत आहे. परिणामी देशात महागाई वाढेल आणि आपण मजबूर होऊ”, असं राहुल गांधी म्हणाले.

“शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर कोणी जाऊ दिले? गृहमंत्री याची जबाबादारी घेत नाहीत, याबाबतस गृहमंत्रींना विचारलं पाहिजे. आता शेतकऱ्यांसोबत अत्याचार होत आहे. सरकार त्यांच्यासोबत बातचित करण्याऐवजी त्यांना मारत आहे. NIA ची धमकी देत आहे. सरकाला लवकरच या विषयावर शेतकऱ्यांशी चर्चा करुन कायदे रद्द करायला हवे”, असं त्यांनी सांगितलं.

“केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करत नाही. केंद्र सरकारने लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढून हे प्रकरण शांत करावं. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. भाजप दोन वर्षांसाठी कायदा मागे घेण्यास तयार झाली आहे. मग ते कायमस्वरुपी का मागे घेऊ शकत नाही?”, असा सवाल राहुल गांधींनी केला (Rahul Gandhi appeal people to not go back).

Published On - 5:29 pm, Fri, 29 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI