
Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरी प्रकरणात पुन्हा एकदा नवीन बॉम्ब टाकला. त्यांनी आज 5 नोव्हेंबर रोजी अजून एक पत्र परिषद घेऊन निवडणूक आयोगावर आरोपांचा बॉम्ब टाकला. हरियाणात भाजपने वोट चोरी करून, मत चोरी करुन सरकार तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. हरियाणात मत चोरी पकडल्याचा दावा त्यांनी केला. हरियाणात आम्ही सखोल चौकशी केल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरियाणात मत चोरी झाल्याचा दावा त्यांनी पुन्हा केला. या पत्र परिषदेत त्यांनी एका मुलीचा फोटो दाखवला. ती ब्राझिलयन मॉडेल असून तिच्या फोटोच्या आधारे विविध नावावर22 ठिकाणी मतदान झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. या मॉडेलच्या नावावर 22 मतदार ओळखपत्र समोर आल्याचा दावा त्यांनी केला. तिचे नाव कधी सीमा तर कधी स्वीटी असल्याचा दावा त्यांनी केला. हरियाणात 25 लाख मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
मॉडेलचा फोटो दाखवत राहुल गांधी यांनी सांगितले की, 10 बुथवर 22 वेळा मतदान केले. प्रत्येक वेळी नावात बदल करण्यात आला. एकाच मॉडेलच्या फोटोवर विविध नावांआधारे 22 वेळा मतदान केले. हरियाणात जे 25 लाख मत चोरी झाली, त्यात हा एक मोठा घोटाळा असल्याचा दावा त्यांनी केला. वोट चोरी, मत चोरी हे 5 श्रेणीत करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. 5,21,619 बोगस मतदार आहे. 93,174 पत्ते बोगस आहेत. 19,26,351 एकगठ्ठा मतदार आहे. फॉर्म 6 आणि 7 चा मोठा गैरवापर झाला. हा एक केंद्रीय कट असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘H’ ते गौडबंगाल
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की ‘H’ शब्दाची आपच्याकडे फाईल आहे. यामध्ये एका संपूर्ण राज्याची माहिती चोरण्यात आली आहे. आम्हाला शंका होती की एका मतदार संघातच नाही तर संपूर्ण राज्यस्तरावर आणि राष्ट्रीयस्तरावर हा कट शिजत आहे. हरियाणात आमच्या उमदेवारांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या. आयोगाकडे आणि पक्षाकडे काहीतरी गडबड सुरु असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. पण राज्याचा कौल आणि निकालामध्ये जमीन आस्मानचा फरक, तफावत दिसली. सर्वांचेच अंदाज फेल ठरले. आम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात असाच अनुभव घेतला. पण आम्ही हरियाणावर अधिक लक्ष केंद्रीत केले आणि मग येथे सर्वच गौडबंगाल बाहेर आले, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP Rahul Gandhi says, “…I want the young people, GenZ of India to understand this clearly because this is about your future…I am questioning the EC, democractic process in India so I am doing it with 100% proof. We are pretty sure that a plan was… pic.twitter.com/i5RatGOVhi
— ANI (@ANI) November 5, 2025
हरियाणात एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचा विजय दाखवत होते. तर हरियाणाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोस्टल मतदान आणि वास्तविक मतदानात मोठा फरक दिसला. हरियाणात यापूर्वी असे कधीच दिसले नाही. त्यामुळे आम्ही खोलात जाऊन चौकशी करण्याचे ठरवले. मी निवडणूक आयोग आणि भारताची लोकशाही प्रक्रियेवर मी त्यामुळेच सवाल उभे करत आहे. हे हवेतील आरोप नाही तर त्यासाठी 100% पुरावे सादर करत आहे. मला खात्री आहे की काँग्रेसच्या महाविजयाचे रुपांतर पराभवात करण्याची योजना आखण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.