Rahul Gandhi : राहुल गांधींनी जिला ब्राझीलियन मॉडल म्हटलं, ती निघाली पिंकी? काँग्रेसच्या मतचोरीच्या दाव्यांवर धक्कादायक खुलासा

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत गडबड झाल्याचा आरोप केला. या प्रकरणी आता महत्वाची माहिती समोर आली आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींनी जिला ब्राझीलियन मॉडल म्हटलं, ती निघाली पिंकी? काँग्रेसच्या मतचोरीच्या दाव्यांवर धक्कादायक खुलासा
Rahul Gandhi
| Updated on: Nov 06, 2025 | 9:43 AM

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेतली. हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला. हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाली, असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. राहुल यांनी पुरावा म्हणून एक वोटर आयडी कार्ड दाखवलं. एका ब्राझीलियन मॉडेलच्या फोटोचा वापर करुन अनेक ठिकाणी मतदान झालं असा दावा राहुल गांधी यांनी केला. पण आता या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.

‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, राहुल गांधी यांनी ज्या महिलेचं वोटर आयडी कार्ड दाखवून वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला, तिने या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. या महिलेचं नाव पिंकी आहे. ती म्हणाली की, ‘मी स्वत: मतदान केलं होतं’. पिंकीने वोट चोरी किंवा निवडणुकीत गडबड असल्याचा आरोप आधारहीन असल्याच सांगितलं. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पिंकीच वोटर आयडी कार्ड दाखवून ती ब्राझिलियन मॉडल असल्याचा दावा केला होता.

पिंकीने काय खुलासा केला?

राहुल यांच्या दाव्यांवर पिंकीने खुलासा केला. तिच्या वोटर आयडी कार्डवर फार आधीपासून चुकीचा फोटो आहे. “2024 मध्ये मी स्वत: मतदान केलं. कुठेही मतचोरी झालेली नाही. मी जेव्हा पहिल्यांदा वोटर आयडी कार्ड बनवण्यासाठी अर्ज केलेला, तेव्हा चुकीच्या फोटोसह वोटर आयडी कार्ड मला मिळालं. त्यावर माझ्या गावातील एक महिलेचा फोटो होता. आम्ही तात्काळ कार्ड परत केलं. पण अजूनपर्यंत योग्य बदल झालेलं कार्ड मिळालेलं नाही. मी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वोटर स्लीप आणि आधार कार्डाच्या आधारे मतदान केलं” असं पिंकी म्हणाली.

भाजपचं उत्तर काय?

राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याचा आणि मतचोरीचा आरोप केला. भाजपने त्यांचे हे दावे फेटाळून लावले. हे दावे खोटे आणि निराधार असल्याचं म्हटलं. आपलं अपयश झाकण्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीला बदनाम करण्यासाठी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत असा पलटवार भाजपने राहुल गांधी यांच्यावर केला.