Goa Elections 2022: राहुल गांधींचा गोवा दौरा; फुटबॉलला मारली किक! बघा व्हिडीओ

राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्तांचा जोश वाढवण्याचा वेगवेळ्या पद्धतीने प्रयत्न करतायेत. या आगोदर आज त्यांनी गोवातल्या एका गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयात दुपारचे जेवण केले आणि नंतर दुचाकी टॅक्सीने सुमारे पाच किलोमीटर प्रवास केला.

Goa Elections 2022: राहुल गांधींचा गोवा दौरा; फुटबॉलला मारली किक! बघा व्हिडीओ
Rahul Gandhi kicks a football in Goa stadium
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 2:59 PM

पणजीः पुढच्या वर्षीच्या गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी आज गोवा दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमच्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्ता्यांचा गर्दीत फुटबॉलची मजा घेतली. त्यांनी ट्विटही केले, “चला गोव्यासाठी नवीन युग सुरू करूया!” (rahul gandhi in goa plays football, Goa Election 2022 )

“मी तुमचा वेळ किंवा माझा वेळ वाया घालवायला आलो नाही. जसा तुमचा वेळ महत्वाचा आहे तसाच माझा वेळ महत्वाचा आहे… आम्ही जाहीरनाम्यात तुम्हाला जी वचनं दिली आहोत ती केवळ वचनं नाही तर आमची हमी आहे,” असं राहुल गांधी त्यांच्या भेटी दरम्यान म्हणाले.

दुचाकी टॅक्सीने प्रवास

राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्तांचा जोश वाढवण्याचा वेगवेळ्या पद्धतीने प्रयत्न करतायेत. या आगोदर आज त्यांनी गोवातल्या एका गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयात दुपारचे जेवण केले आणि नंतर दुचाकी टॅक्सीने सुमारे पाच किलोमीटर प्रवास केला.

गांधी शनिवारी सकाळी गोव्यात आले. दक्षिण गोव्यातील मच्छिमारांना संबोधित केल्यानंतर गांधींनी पणजी-मारगाव महामार्गावरील गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयात जेवण केले. त्यांच्यासोबत गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे होते. त्यानंतर, गांधींनी रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी मोटरसायकल पायलट, दुचाकी टॅक्सीने प्रवास केला. राहुल गांधी यांनी यावेळी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सुरक्षाव्यवस्था नाकारुन राहुल गांधी यांनी दुचाकीवरुन प्रवास केल्याचं पाहायला मिळालं. दुचारी प्रवासाचा राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय.

गोव्यात नवी पहाट पहायची आहे- ममता बॅनर्जी

दुसरीकडे तृणमूल काँग्रेसही गोवा विधानसभेच्या मैदानात उतरली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “गोवा आणि पश्चिम बंगालला फुटबॉल आवडतो. पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये आमचा नारा ‘खेला होबे’ होता. यावेळी आम्हाला गोव्यात नवी पहाट पहायची आहे. ममता गोव्यात नवीन पहाट कशी करणार, असं म्हणत असाल तर मी कुठेही जाऊ शकते. माझा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे,” असं ममता बॅनर्जी गोव्यात बोलताना म्हणाल्या.

Other news

UP Elections 2022: सहा निलंबित बसपा आमदारांचा सपामध्ये प्रवेश, अखिलेशने केले स्वागत

“धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे” RSS च्या वार्षिक बैठकीत दत्तात्रेय होसाबोळेंचं भाष्य

Azadi ka Amrit Mahotsav: सृजनशील कलावंतांना मोदी सरकारची अनोखी संधी, देशभरातून मागवले अर्ज

rahul gandhi in goa plays football, Goa Elections 2022

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.