ज्यांना भीती वाटते त्यांनी खुशाल जावे; काँग्रेस सोडून जाणारे संघाचे होते: राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून गेलेल्यांवर टीका केली. (Rahul Gandhi Said Congress Worker Should Not Fear Bjps s Fake News)

ज्यांना भीती वाटते त्यांनी खुशाल जावे; काँग्रेस सोडून जाणारे संघाचे होते: राहुल गांधी
Rahul Gandhi

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून गेलेल्यांवर टीका केली. ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेसमधून खुशाल जावं. ज्यांना कशाचीच भीती वाटत नाही असे लोक काँग्रेसमध्ये आहेत. त्यांचं स्वागत आहे. काँग्रेस सोडून गेलेले सर्व लोक संघाशी संबंधित होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. (Rahul Gandhi Said Congress Worker Should Not Fear Bjps s Fake News)

राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना फेक न्यूजमुळे घाबरून न जाण्याचं आवाहन केलं. भाजपकडून येणाऱ्या फेक न्यूजमुळे घाबरून जाऊ नका. कोरोना काळात उत्तर प्रदेशात चांगलं काम केल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असतील तर त्यांच्यावर हसा. भारताच्या सीमाभागात चीनने घुसखोरी केली नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतील तर त्यांच्यावरही हसा, असं राहुल यांनी सांगितलं.

फेक न्यूजवरील लोकांचा विश्वास उडाला

भाजपकडून पसरविण्यात येणाऱ्या फेक न्यूजवर विश्वास ठेवणं आता लोकांनी बंद केलं आहे. त्यामुळेच आता भाजपच्या फेक न्यूजबाबत घाबरण्याचं कारण नाही, असं त्यांनी सांगितलं.

राहुल गांधींचा सभात्याग

दरम्यान, राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच संसदीय संरक्षण समितीच्या बैठकीतून वॉकआऊट केलं होतं. सुरक्षा समितीत डोकलामसहीत सीमेवरील हालचालींवर चर्चा करण्याची मागणी राहुल यांनी केली होती. मात्र, समितीने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे समितीचा निषेध म्हणून राहुल यांनी सभात्याग केला होता.

राहुल गांधी-प्रशांत किशोर चर्चा

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतल्यानंतर प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल आणि पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. त्यामुळे पंजाबच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. (Rahul Gandhi Said Congress Worker Should Not Fear Bjps s Fake News)

 

संबंधित बातम्या:

आधी शरद पवार, आता राहुल गांधी, प्रियंका गांधींना भेटले प्रशांत किशोर; पंजाब निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा?

शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी; वाचा, राहुल गांधींबरोबरच्या बैठकीची इन्साईड स्टोरी

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?, सोनिया गांधींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

(Rahul Gandhi Said Congress Worker Should Not Fear Bjps s Fake News)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI