प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?, सोनिया गांधींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 14, 2021 | 3:48 PM

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. (prashant kishor)

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?, सोनिया गांधींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
Prashant Kishor

नवी दिल्ली: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे प्रशांत किशोर (पीके) लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजकीय रणनीती करण्याच्या कामातून संन्यास घेण्याची पीके यांनी आधीच घोषणा केली होती. त्यामुळे ते सक्रिय राजकारणात येण्याच्या चर्चेला अधिकच बळ मिळत आहे. (Prashant Kishor may Join Congress Big Hint After Meeting With Gandhis)

प्रशांत किशोर यांनी काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशीही ऑनलाईन संवाद साधला. केसी वेणुगोपालही या बैठकीला उपस्थित होते. तब्बल तासभर ही बैठक चालली. या बैठकीत देशाचा राजकीय कल, देशातील काँग्रेसची सध्याची स्थिती आणि त्यावरील उपाय यावरही या बैठकीत चर्चा झाली.

पवारांचा विषय निघाला नाही

प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांच्यात पंजाबमधील वादावर चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येतं. विविध राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या स्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रे शरद पवारांकडे देण्यावर या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसचा लोकसभेतील नेता बदलण्यात येणार नाही. या अधिवेशनात काँग्रेसचे लोकसभेतील नेते म्हणून अधीर रंजन चौधरीच काम पाहतील, असंही सूत्रांनी सांगितलं.

प्रशांत किशोर यांनी दिले संकेत

पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याचं प्रशांत किशोर यांनी सांगितलं होतं. सध्या सुरू असलेलं काम पुढे सुरू ठेवण्याची इच्छा नाही. या क्षेत्रात मी पुरेसं काम केलं आहे. आता थांबण्याची आणि आयुष्यात वेगळं काही करण्याची वेळ आहे. त्यामुळे मी हे काम सोडण्याचं ठरवलं आहे, असं पीके यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं होतं.

2017मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकीवेळी प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची पहिल्यांदा भेट झाली होती. उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रशांत किशोर यांची रणनीती काही चालली नव्हती. काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पाच वर्षानंतर पीके पुन्हा एकदा राहुल गांधींना भेटले आहेत. पण या भेटीऐवजी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांनीच अधिक जोर धरला आहे. (Prashant Kishor may Join Congress Big Hint After Meeting With Gandhis)

संबंधित बातम्या:

आधी शरद पवार, आता राहुल गांधी, प्रियंका गांधींना भेटले प्रशांत किशोर; पंजाब निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा?

शरद पवार-प्रशांत किशोर भेट राजकीय नाही; लोकसभेच्या रणनीतीचाही प्रश्नच नाही: अजित पवार

पवार-प्रशांत किशोर भेटीत ‘मविआ’ आणि ‘बंगाल मॉडेल’वर चर्चा?; जयंत पाटील ‘सिल्व्हर ओक’वर तातडीने दाखल

(Prashant Kishor may Join Congress Big Hint After Meeting With Gandhis)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI