आधी शरद पवार, आता राहुल गांधी, प्रियंका गांधींना भेटले प्रशांत किशोर; पंजाब निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतल्यानंतर प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. (Prashant Kishor)

आधी शरद पवार, आता राहुल गांधी, प्रियंका गांधींना भेटले प्रशांत किशोर; पंजाब निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा?
Prashant Kishor

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतल्यानंतर प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल आणि पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. त्यामुळे पंजाबच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. (Poll strategist Prashant Kishor meets Congress leader Rahul Gandhi in Delhi)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांना आज लखनऊला जायचं होतं. मात्र, प्रशांत किशोर यांच्यासोबत अचानक मिटिंग ठरल्याने लखनऊचा दौरा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर आज प्रशांत किशोर राहुल गांधी आणि प्रियंका यांना भेटले. यावेळी पंजाबचे प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. त्यामुळे पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती ठरविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

पवारांशी दोनदा भेट

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीसाठी रणनीती तयार केली होती. त्यामुळे ममतादीदी पुन्हा सत्तेवर आल्या होत्या. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी शरद पवारांशी चर्चा केली होती. 11 जून रोजी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रशांत किशोर पोहोचले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये साडे तीन तास चर्चा झाली. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केलं. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहिले. ही भेट संपल्यानंतर शरद पवार आमदार रोहित पवार यांच्यासह पुण्याच्या दिशेनं रवाना झाले. या भेट राजकीय नसल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर काही दिवसांनी पवार दिल्लीत आले असता प्रशांत किशोर यांनी पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीतील चर्चेचा तपशीलही गुप्त ठेवण्यात आला होता. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरुन या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशांत किशोर यांचा संन्यास

पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर यांच्या अचूक व्यवस्थापनामुळे तृणमूल काँग्रेसला 200 हून अधिक जागांवर विजय मिळवला होता. मात्र, निकालाच्या दिवशी प्रशांत किशोर यांनी आपण या निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आधी शरद पवार आणि आता राहुल गांधी यांची प्रशांत किशोर यांनी भेट नेमकी कशासाठी घेतली?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Poll strategist Prashant Kishor meets Congress leader Rahul Gandhi in Delhi)

 

संबंधित बातम्या:

शरद पवार-प्रशांत किशोर भेट राजकीय नाही; लोकसभेच्या रणनीतीचाही प्रश्नच नाही: अजित पवार

पवार-प्रशांत किशोर भेटीत ‘मविआ’ आणि ‘बंगाल मॉडेल’वर चर्चा?; जयंत पाटील ‘सिल्व्हर ओक’वर तातडीने दाखल

मोठी बातमी: प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला, साडेदहा वाजता दोघांचीही भेट होणार, कारण गुलदस्त्यात!

(Poll strategist Prashant Kishor meets Congress leader Rahul Gandhi in Delhi)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI