AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मोदींच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा राजीनामा? राहुल गांधींनी समोर आणलं असं काही की…देशात एकच खळबळ!

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 20 जुलै रोजी विद्यार्थ्यावर करण्यात आलेल्या लाठीचार्जविषयी गंभीर असे आरोप केले. त्याआधी त्यांनी संसदेतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याच आदेशाने विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मदतीने हल्ले करण्यात आले, असा दावा केला.

आता मोदींच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा राजीनामा? राहुल गांधींनी समोर आणलं असं काही की...देशात एकच खळबळ!
rahul gandhi and narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 29, 2026 | 6:44 PM
Share

Rahul Gandhi : सीजेपीचे आंदोलन संपलेले असले तरीही 20 जुलै रोजी सीजेपीच्या नेतृत्त्वात झालेल्या आंदोलनाचा मुद्दा अजूनही संपलेला नाही. या आंदोलनावर पोलीस तसेच सुरक्षा दलाच्या जवांना मोठा लाठीमार केला होता. या लाठीमारात अनेक तरुण विद्यार्थी जखमी झाले होते. विद्यार्थ्यांवरील आंदोलनात पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला, असा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जातोय. असे असतानाच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत मोठे दावे करत बड्या नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पॅलेट गनच्या मदतीने हल्ला

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 20 जुलै रोजी विद्यार्थ्यावर करण्यात आलेल्या लाठीचार्जविषयी गंभीर असे आरोप केले. त्याआधी त्यांनी संसदेतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याच आदेशाने विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मदतीने हल्ले करण्यात आले, असा दावा केला. राहुल गांधी यांच्या या दाव्यानंतर संसदेत मोठा गोंधळ उडाला होता. आता त्यांनी पत्रकार परिषदेत याच आरोपांचा पुनरुच्चार केला. यावेळी बोलताना विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मदतीने हल्ला झाला. एका विद्यार्थ्याला डोळा गमवावा लागला. अमित शाहांच्या आदेशानेच हे हल्ले करण्यात आले. मी याबाबत विचारणा करणारे पत्र 25 जुलै रोजी लिहिले. परंतु त्या प्रश्नाला उत्तर मिळाले नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

तसेच ज्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मदतीने हल्ले करण्यात आले. त्यांच्या शरीरात छर्रे आहेत. अमित शाहा हे फोनवरून आदेश देत होते. मी स्वत: पाहिलं, असा मोठा दावाही राहुल गांधी यांनी केला.

अमित शाहांचा राजीनामा घ्यावा-राहुल गांधी

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाहा यांचा राजीनामा घ्यावा. शाहा यांना पदावरून हटवावं. पॅलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला, याची चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करावी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. अमित शाहा हे नरेंद्र मोदी यांच्या सर्वात जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे आता सरकार राहुल गांधी यांच्या मागणीचा विचार करणार का? काँग्रेस नवे आंदोलन छेडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं