
Railway Budget Expectations 2026: भारतीय रेल्वे गेली अनेक वर्षे तोट्यात आहे. रेल्वेच्या उत्पनाचा बहुतांश हिस्सा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होत आहे. अनेक वर्षे रेल्वेचा ऑपरेटिंग रेषो १०० टक्के किंवा त्याच्या वरती राहिला आहे. म्हणजे रेल्वे जेवढे कमाई करत आहे त्याहून जास्त रक्कम खर्च करत आहे. या परिणाम रेल्वेच्या विस्तारावर, नव्या तंत्रज्ञानावर आणि सुरक्षेवरील गुंतवणूकीवर मर्यादित होत होता. परंतू अलिकडच्या वर्षात हे चित्र हळूहळू बदलत आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार साल २०२२-२३ मध्ये भारतीय रेल्वेने २,५१७.३८ कोटी रुपयांचा नेट सरप्लस नोंदवला होता, तर त्याच्या आदल्या वर्षी १५,०२४.५८ कोटी रुपयांचा तोटा होता. याच काळात ऑपरेटिंग रेषो १०७.३९ टक्क्यांवरुन सुधरत ९८.१० टक्क्यांवर आला. याचा अर्थ रेल्वेने आपल्या कमाईच्या तुलनेत खर्चावर नियंत्रण करण्यात यश मिळवले. हा बदल गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने लागोपाठ बजेटमध्ये केलेली तरतूद आणि पायाभूत सुविधासाठी दिलेला पाठींब्यामुळे झाला आहे.
रेल्वे बजेटचे आकडे देखील हे सांगत आहे की ऑपरेटिंग रेव्हेन्यूच्या मोर्च्यावर स्थिती मजबूत झाली आहे. साल २०२३-२४ मध्ये रेल्वेची एकूण रेव्हेन्यू रिसीट २.५६ लाख कोटी रुपये होती, जी २०२५-२६ च्या बजेट अंदाजात वाढून ३.०२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचणार आहे. या दरम्यान, रेल्वेचा कर्मचाऱ्यांवरील खर्च देखील वाढला आहे.परंतू त्याचा वेग कमाईच्या तुलनेने मर्यादित आहे. त्यामुळे ऑपरेटिंग रेषो ९८-९९ टक्क्यांच्या दरम्यान टिकला आहे. हे संतुलन यासाठी महत्वाचे आहे की यामुळे रेल्वेचा विकास फंड आणि सेफ्टी फंडमध्ये तरतूद करण्यास संधी मिळाली आहे.
रेल्वेचा कमाई आणि खर्चाचा ऑपरेटिंग रेषो
| आर्थिक वर्ष | ऑपरेटिंग रेषो (%) | स्थितीचा संकेत |
|---|---|---|
| 2021-22 | 107.39 | कमाई पेक्षा जादा खर्च , मोठा दबाव |
| 2022-23 | 98.10 | खर्चावर नियंत्रण, सरप्लसचे पुनरागमन |
| 2023-24 (Actual) | 98.43 | संतुलन तयार, स्थिर स्थिती |
| 2024-25 (Budget) | 98.22 | किरकोळ सुधारणेचा अंदाज |
| 2024-25 (Revised) | 98.90 | खर्चाचा हलका दबाव |
| 2025-26 (Budget) | 98.43 | नियंत्रित खर्चासह वाढ |
या टेबलवरुन स्पष्ट होते की साल २०२१-२२ मध्ये रेल्वे १०० रुपयांच्या कमाईवर १०७ रुपयांहून जास्त खर्च करत होती., साल २०२२-२३ पासून ऑपरेटिंगचा रेषो सातत्याने १०० च्या खाली बनला आहे.हा तोच टर्निंग पॉईंट आहे, जेथे रेल्वेच्या आर्थिक स्थिती सुधारणा सुरु झाली आहे आणि मंत्रालयाचा खर्च मॅनेज करताना रेल्वेचा विस्तारावर फोकस करण्यास रेल्वेला संधी मिळाली आहे.
रेल्वेचा जेव्हा खर्च आणि कमाईतील अंतर आता मर्यादित होताना दिसत आहे. तर रेल्वे मंत्रालयाचा फोकस हळूहळू विस्ताराकडे शिफ्ट होत आहे. ब्रोकरेज फर्म PL Capital च्या मते बजेट २०२६ मध्ये रेल्वेच्या भांडवली खर्चात सुमारे ५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण भांडवली खर्च सुमारे २.६५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.सिग्नलिंग सिस्टम, ट्रॅक अपग्रेड आणि सेमी-हाय-स्पीड कॉरिडॉर सारख्या प्रोजेक्टवर खर्च वाढण्याची आशा आहे. आर्थिक वर्षे २०२६ च्या डिसेंबरपर्यंत ८० टक्क्यांहून जास्त भांडवली खर्चाचा वापर हे दर्शवत आहे की अंमलबजावणीचा वेग वाढला आहे.
रेल्वेच्या कमाई आणि खर्चाचील रेषोतील सुधार याचा अर्थ रेल्वेच्या प्रवाशांना आणखी सुधारणा पाहायला मिळणार आहेत. प्रवाशांना अधिक सुविधा मिळण्याची आशा आहे. जानेवारीपासून सुरु झालेल्या वंदेभारत स्लीपर ट्रेनमुळे लांबचा प्रवास अधिक आरामादायी होणार आहे. या गाड्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.
कमी भाड्यात आरामदायी सुविधा देणाऱ्या १०० अमृत भारत नॉन-एसी ट्रेनचे नवे मार्गांवर धावण्याची शक्यता आहे. स्वच्छ कोच, चांगली आसन व्यवस्था आणि वेगातमध्ये झालेली वाढ त्यामुळे सणासुदीत प्रवास करणाऱ्यांचा फायदा होणार आहे. तसेच करोनो काळापासून रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीटातील सवलत बंद केली आहे. ही सवलत पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.