AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway News : रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा, आता तुमचे तिकीट कुटुंबियांच्या नावे ट्रान्सफर करा, कसे करायचे ते पाहा

रेल्वे प्रवासी आपली कन्फर्म तिकीट आता आपल्या रक्तातील नात्यांच्या नावे स्थानांतर करू शकणार आहेत. परंतू त्यासाठी त्यांना काही नियम पाळावे लागणार आहेत.

Railway News : रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा, आता तुमचे तिकीट कुटुंबियांच्या नावे ट्रान्सफर करा, कसे करायचे ते पाहा
TICKETImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 22, 2023 | 8:33 PM
Share

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असला आणि  परंतू तुम्हाला अचानक दुसरे काही महत्वाचे काम आले. तर चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण आता तुमच्या कन्फर्म तिकीटावर तुमच्या रक्ताच्या नात्यातील कौटुंबिक सदस्याला आता तुमच्या ऐवजी रेल्वेचा प्रवास करता येणार आहे. परंतू यासाठी तुमचे तिकीट मात्र कन्फर्म असायला हवे आहे. पश्चिम रेल्वेने यासंदर्भात ट्वीटरद्वारे माहीती दिली आहे.

कन्फर्म तिकीट ट्रान्सफर करण्याची सुविधा

ईद निमित्त शुक्रवारी 21 एप्रिल रोजी सिनेमाघरात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान चित्रपट ‘किसी का भाई, किसी का जान’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचा आणि नावाचा कल्पक वापर पश्चिम रेल्वेने मोठ्या अक्षरात ‘किसी का टिकट किसी का सफर’ नावाने ही योजना जाहीर केली आहे. रेल्वेने या संदर्भात स्पष्ट करताना म्हटले आहे की रेल्वे प्रवासी आपली कन्फर्म तिकीट आता आपल्या रक्तातील नात्यांच्या नावे स्थानांतर करू शकणार आहेत. परंतू त्यासाठी त्यांना काही नियम पाळावे लागणार आहेत.

काय आहेत नियम…

ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट आहे त्यांना जर प्रवास करायचा नसेल आणि त्यांच्या ऐवजी त्यांच्या कुटुंबियांना या तिकीटाचा वापर करायचा असेल तर त्याच्या 24 तास आधी नजिकच्या पीआरएस काऊंटरवर जाऊन चिफ रिझर्व्हेशन सुपर वायझरला रिक्वेस्ट करावी लागणार आहे. कुटुंबियांच्या सदस्यांचे नावे आरक्षित कन्फर्म तिकीट ट्रान्सफर करण्याची सुविधा काऊंटर तिकीट आणि ऑनलाईन तिकीट दोन्हीकरीता लागू आहे. ऑनलाईन काढलेले तिकीट कन्फर्म होताच प्रवासी आपल्या कुटुंबियाचे नावे ते ऑनलाईन स्ट्रान्सफर करू शकतील.

हे सोपस्कार पार पाडा

तिकीट कन्फर्म झाल्यावर प्रवाशांना नजिकच्या पीआरएस काऊंटरवर जावे लागेल.

ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी पीआरएस काऊंटरला जावून रिक्वेस्ट करावी लागेल.

ज्या कुटुंबातील सदस्याला तुमच्या ऐवजी प्रवास करायचा असेल त्याची कागदपत्रे सादर करा.

ज्याच्या नावे तिकीट स्ट्रान्सफर करायचे त्याचे आणि स्वत:चे सरकारी ओळखपत्र, ब्लड रिलेशन दाखविणारे कागदपत्र, प्रवाशाच्या कन्फर्म तिकीटाचे पत्र दाखवावी लागेल.

ऑनलाईन तिकीटाबाबतही तिकीट कन्फर्म झाल्यावरच आपल्या रक्ताच्या नात्यातील सदस्यांच्या नावे तिकीट स्टान्सफर करता येईल

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.