राज बब्बर पुन्हा येणार समाजवादीत, निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचा हात सोडणार

राज बब्बर पुन्हा येणार समाजवादीत, निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचा हात सोडणार
Raj babbar.

समाजवादी प्रवक्त्यांनी जे तीन इशारे केले आहेत, ते सर्व राज बब्बर यांच्याविषयीच संकेत देत आहेत. त्यामुळे राज बब्बर यांचे कॉंग्रेसमध्ये येणार राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे. कारण कॉंग्रेसमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर याच गोष्टींची चर्चा आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 27, 2022 | 4:11 PM

दिल्लीः अभिनेता राज बब्बर यांनी आपली राजकीय कारकीर्द चालू की, ती जनता दलापासून. पण स्वतःच्या राजकीय कारकीर्दीला झळाली मिळाल्यावर 2006 मध्ये राज बब्बर (Raj babbar) यांनी समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) अखरेचा रामराम ठोकला आणि कॉंग्रेसमध्ये (Congress) गेले. सध्याच्या उत्तर प्रदेशाची निवडणुकीमुळे (Uttar Pradesh Election 2022 ) देशात यूपीच्या निवडणुकीची जशी चर्चा आहे, तशीच चर्चा राज बब्बर समाजवादी पक्षाच्या पुन्हा वाटेवर असल्याचे बोललेल जात आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र चालू असतानाच कॉंग्रेस पक्षातील नेत्यांची सुरू असणारी गळतीचा प्रश्नही चर्चेचा विषय आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असणारे आर. पी. एन सिंग यांचे भाजपमध्ये जाणे, माजी खासदार राकेश सचान यांनीही कॉंग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये सामील होणे हे ही कॉंग्रेससाठी धक्कादायक होते. आता कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांची समाजवादी पुन्हा घरवापसी असण्याचे संकेत समाजवादीच्या प्रवक्त्यांनी दिले आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरूल हसन चांद यांनी कू वरून सांगितले आहे की, कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष, माजी समाजवादी नेते, अभिनेते लवकरच समाजवादी होत आहेत.

समाजवादीच्या पक्षाच्या प्रवक्ताकडू जाहीर

समाजवादी प्रवक्त्यांनी जे तीन इशारे केले आहेत, ते सर्व राज बब्बर यांच्याविषयीच संकेत देत आहेत. त्यामुळे राज बब्बर यांचे कॉंग्रेसमध्ये येणार राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे. कारण कॉंग्रेसमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर याच गोष्टींची चर्चा आहे.

राजकारणातील वावर कमी

उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसची धुरा जेव्हापासून प्रियंका गांधी यांच्याकडे दिली गेली आहे तेव्हापासून राज बब्बर यांचा राजकीय वावर कमी झाला आहे. 2109 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच राज बब्बर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्या राजीनाम्यानंतर राज बब्बर कोणत्याच कार्यक्रमात दिसले नाहीत. कॉंग्रेसच्या जी-23 नेत्यांमध्ये राज बब्बर यांचे नाव आहे. त्यामुळे सपाच्या घरवापसीबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत.

जनता दलापासून राजकीय वाटचाल

राज बब्बर यांनी आपली राजकीय वाटचाल जनता दलापासून केली, पाच वर्ष जनता दलाबरोबर थांबून त्यांनी समाजवादी पक्षात सामील झाले. 1994 मध्ये समाजवादी पक्षाकडून त्यांना लोकसभेवर पाठविण्यात आले. त्यानंतर 2009 मध्ये समाजवादीच्या तिकिटावर निवडून येऊन ते पुन्हा खासदार झाले. समाजवादीच्या अमर सिंग यांचे पक्षातील वर्चस्व वाढू लागल्यानंतर त्यांनी 2006 मध्ये त्यांना सपाचे नाते तोडले आणि माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासोबत जनमोर्चाची निर्मिती केली.

समाजवादी विरोधात निवडणूक आणि विजयही

समादवादी पक्षाची साथ सोडल्यानंतर दोन वर्षानंतर 2008 साली त्यांनी कॉंग्रेसचा हात धरला. समाजवादीचे प्रमुख अखिलेश यादव 2009 मध्ये कन्नोज आणि फिरोझाबादमधून ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी फिरोझाबादची जागा सोडून दिली. 2009 च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्याविरोधात कॉंग्रेसने राज बब्बर यांनी निवडणूक लढविली.

राज बब्बर उत्तराखंडमधून राज्यसभेवर

फिरोझाबाद पोटनिवडणुकीत राज बब्बर यांनी अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या पत्नीचा त्यांनी दारून पराभव केला. यामुळे समाजवादी पक्षाला याचा मोठा फटका बसला. त्यामुळे राज बब्बर यांचे राजकारणातील वजन वाढले. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत व्ही. के. सिंग यांच्याविरोधात झालेल्या लढाईत राज बब्बर यांना हार पत्करावी लागली. त्यानंतर राज बब्बर यांना उत्तराखंडमधून कॉंग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले.

राजकारणावरवची पकड ढिली होत गेली

राज बब्बर यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे 2016 च्या निवडणुकीची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर सलग 2017 आणि 2019 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशमधील टुंडलाचे असणारे राज बब्बर यांनी समाजवादी पक्षावर चांगली पकड मिळविली होती, त्यानंतर कॉंग्रेसमध्ये गेलेल्या राज बब्बर यांना ती पकड ठेवात आली नाही त्यामुळे ते पुन्हा समाजवादी पक्षाच्या वाटेवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

जळगावमध्ये पुन्हा खडसे विरुद्ध महाजन, खडसे म्हणातात महाजनांनी भाजप विकली…तर महाजन म्हणतात…

औरंगाबादेत महाराणा प्रतापांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये; मंत्री अब्दुल सत्तारांचं खा. इम्तियाज जलील यांना आव्हान!

Eknath Khadse : रोहिणी खडसेंचा पराभव छुप्या युतीमुळंच, गिरीश महाजन यांनी भाजप विकली, एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें