हा माणूस राहुल गांधींच्या जीवावर उठला, त्यांच्यासह 25 खासदारांना गोळी घालण्याची धमकी

"लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जाहीरपणे हत्येची धमकी दिली जात आहे. ही RSS ची ती विषारी मानसिकता आहे, ज्याने नथूराम गोडसेला जन्म दिलेला. हे भाजप-RSS च्या कट्टर वैचारिक उग्रतेचं मॉडेल आहे"

हा माणूस राहुल गांधींच्या जीवावर उठला, त्यांच्यासह 25 खासदारांना गोळी घालण्याची धमकी
raj singh amera
| Updated on: Feb 20, 2026 | 9:00 AM

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींसह 25 खासदारांना गोळी मारण्याची धमकी देणाऱ्या राज सिंह आमेरा विरोधात पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. राज सिंह आमेराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोशल मीडियावरुन व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून ही धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी याची गांभीर्यपूर्वक दखल घेत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. कोटा शहर पोलिसांनी ही कारवाई केलीय. या प्रकरणात कारवाई सुरु आहे. कायदा सर्वोच्च आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई होणार असं कोटा शहरचे एसपी तेजस्वनी गौतम यांनी जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे.

व्हिडिओमध्ये राज सिंह आमेराने स्वत:ला करणी सेनेचा कोटा प्रभारी म्हटलं आहे. करणी सेनेने आमचा राज सिंहशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ज्या अकाऊंटवरुन ही धमकी दिली, ते बंद करण्यात आलं आहे. राज सिंह आमेरा कोटाचा राहणारा आहे. त्याने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट करुन धमकी दिली होती.

ज्याने नथूराम गोडसेला जन्म दिलेला

“लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जाहीरपणे हत्येची धमकी दिली जात आहे. ही RSS ची ती विषारी मानसिकता आहे, ज्याने नथूराम गोडसेला जन्म दिलेला. हे भाजप-RSS च्या कट्टर वैचारिक उग्रतेचं मॉडेल आहे. जिथे असहमती आणि विरोधाला राष्ट्र विरोध दाखवून वातावरण निर्मिती केली जाते. शेवटी हिंसेसाठी आधार तयार केला जातो” असं राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा म्हणाले.

कोट्यवधि भारतीयांच्या हक्काचा आणि न्यायाचा आवाज

“संवैधानिक पदावर बसलेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या देशातील कोट्यवधि भारतीयांच्या हक्काचा आणि न्यायाचा आवाज आहे. पण त्यांच्या हत्येची धमकी देणारे, षडयंत्र रचणारे कट्टरतावादी संघटनेचे नेते, कार्यकर्ते खुलेआम फिरत आहेत. अशा लोकांवर कधी कारवाई होणार?. BJP-RSS ने कितीही विष पसरवूंदे हा देश गोडसेच्या विचारावर नाही, गांधीच्या मार्गावर चालेल” असं गोविंद सिंह डोटासरा यांनी सांगितलं.