
Raja Raghuvanshi and Sonam Latest News: राजा रघुवंशी याचा भाऊ विपिन याने माध्यमांसोबत संवाद साधताना सोनम हिला मंगळ होता असा खुलासा केला आहे. मंगळ दोषापासून मुक्त होण्यासाठी तिने राजाची हत्या केल्याचं अनेक ठिकाणांहून उघड झालं आहे. राजाची हत्या केल्यानंतर प्रियकर राज याच्यासोबत संसार थाटण्याच्या तयारीत सोनम होती अशी माहिती देखील समोर येत आहे. विपिन याने सांगितलं की, सोनम हिचा भाऊ गोविंदा याच्यासोबत माझं बोलणं झालं आहे. गोविंदा म्हणाला, ‘यामध्ये माझी बहीण गुन्हेगार आहे. तिला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तिला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे.’ एवढंच नाही तर, राजाचा भाऊ विपिन म्हणाला की, राजा आणि सोनमच्या लग्नात मंगळ हा देखील एक वाद होता. तिने मंगळ दोष मिटवण्यासाठी राजाची हत्या केली.
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, सर्वत्र हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जेव्हा सोनमला तिचा मित्र किंवा प्रियकर राज कुशवाहासोबत संसार थाटायचा होता, तर तिने राजा रघुवंशीशी लग्न का केलं? याठिकाणी दुसरा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. जेव्हा सोनमने राजाशी लग्न केलं, तर तिने त्या निष्पाप माणसाची हत्या का केली? विपिनने या दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
लग्नापूर्वी राजा आणि सोनम यांनी लग्नासाठी विवाहनोंदनी केली होती.जेथे दोघांच्या बायोडाटामध्ये कुंडली देखील देण्यात आल्या होता. ज्यामध्ये ते दोघेही ‘मांगलिक’ असल्याचे विशेषतः नमूद केले होते. मांगलिक मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात अडथळे येतात हे सर्वांनाच माहिती आहे. कारण मांगलिक मुलाच्या आणि मुलीच्या लग्नासाठी दोघांना देखील मंगळ असणं गरजेचं नाही. अन्यथा त्यांच्या वैवाहिक आयुष्यात इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
पंडित अजय दुबे यांनी धक्कादायक दावा केला. मिळालेल्या माहितीनुसार, राजाचा मृतदेह आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याची कुंडली दाखवली होती. त्यावेळी पंडित अजय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांच्याही कुंडलीमध्ये मंगळ दोष होता. हा अशुभ योग समजला जातो.
सोनम राजाची हत्या घडवून आणू शकते, असा योग कुंडलीत दिसत होता, असं दुबे यांनी सांगितलं. अजय दुबे यांनी असाही दावा केला की, या खून प्रकरणात दोन मुली सहभागी आहेत. या गुंतागुंतीच्या हत्याकांडाच्या चौकशीत आणखी एका मुलीचे नाव समोर येईल. ही मुलगी मध्य प्रदेशातील आहे. या घटनेत आरोपींची संख्या आणखी वाढू शकते. सध्या पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी सोनम आणि इतर चार जणांना अटक केली आहे.