AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिर दान चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट, चंपत राय, अनिल मिश्रा यांना क्लीनचीट; केवळ 8 जणच…

अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. एसआयटीने आपल्या अंतिम अहवालात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांना क्लीनचीट दिली आहे. या प्रकरणातील 8 जणांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामुळे राय आणि मिश्रा यांच्यावरील आरोपांचे खंडन झाले आहे.

राम मंदिर दान चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट, चंपत राय, अनिल मिश्रा यांना क्लीनचीट; केवळ 8 जणच...
champat raiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 18, 2026 | 12:51 PM
Share

अयोध्येतील राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आपला फायनल रिपोर्ट श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला सोपवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या रिपोर्टमध्ये ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचं नाव नाहीये. त्यामुळे चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना एसआयटीने क्लीनचिट दिल्याचं मानलं जात आहे. तर आठ जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. दोघांनीही दानचोरी प्रकरणात 27 जून रोजी पदांचा राजीनामा दिला होता. आता त्यांना क्लीनचीट मिळाली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटी चोरी प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यांची एसआयटी समिती स्थापन केली होती. लखनऊ मंडलायुक्त विजय विश्वास पंत यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. 23 जून रोजी या समितीने आपला प्राथमिक रिपोर्ट सादर केला होता. त्या आधारावर 25 जून रोजी श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

कारवाईचा मार्ग मोकळा

एसआयटी रिपोर्टनंतर अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, करुणेश पांडेय, मनीष कुमार यादव, सुभाष श्रीवास्तव, श्रीरामशंकर यादव टिन्नू आणि लवकुश मिश्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. फायनल रिपोर्ट ट्रस्टला देण्यात आल्यानंतर आता या लोकांविरोधात कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राय यांनी आरोप फेटाळले होते

मीडिया रिपोर्ट्स नुसार, एसआयटी चौकशीवेळी चंपत राय यांनी या चोरी प्रकरणात आपला हात नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं होतं. मी स्वत: या चोरीची तक्रार केली होती. त्यानंतर संशयित आरोपींना अटक करण्यात आली, असं चंपत राय यांनी म्हटलं होतं. या तीन सदस्यीय एसआयटी टीममध्ये किरण एस आणि विशेष सचिव (अर्थ) नील रतन कुणार सदस्य म्हणून सामील आहेत.

आरोपींना आरोप कबूल

दरम्यान, एसआयटी तपासात आरोपींनी दान चोरी केल्याचा आरोप स्वीकारला आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करणअयात आलेली आहे. या चोरीच्या घटनेनंतर समितीने दानाच्या पैशाच्या गनतीची वेळ बदलली आहे. आता केवळ एकाच पाळीत म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ ठरवण्यात आला आहे.

Follow Us
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...
DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
Amruta Fadnavis | DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ...
Corporator's Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Rohit Pawar | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान! अजितदादांच्या गटाने भाजपची साथ सोडली तर...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरलं