बाबा रामदेवचं कोरोना औषधही बाजारात, लॉचिंगला गडकरी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री !

योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना व्हायरसवरचं अधिकृत तथा प्रमाणित औषध बाजारात आलं आहे. | Ramdev baba patanjali

बाबा रामदेवचं कोरोना औषधही बाजारात, लॉचिंगला गडकरी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री !
रामदेव बाबा

नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांचं कोरोना व्हायरसवरचं अधिकृत तथा प्रमाणित औषध बाजारात आलं आहे. याचसोबत पतंजलीचा वैज्ञानिक रिसर्च पेपर देखील लॉन्च केला गेला आहे. या लॉन्चिंग कार्यक्रमाला देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन तसंच रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. आम्ही लॉन्च केलेला रिसर्च पेपर कोरोना व्हायरसच्या पहिल्या प्रमाणित औषधाशी संबंधित आहे. (Ramdev baba Patanjali releases Scientific research paper on Medicine Covid 19)

“गर्वाचा क्षण…. पतंजलीद्वारे कोव्हिड 19 च्या करिता पहिलं प्रमाणित औषध सादर करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे”, असं पतंजली आयुर्वेदने ट्विट करुन म्हटलं आहे. आम्ही योग आणि आयुर्वेद यांना समांतर पातळीवर पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. कोरोनिल कोट्यवधी लोकांना जीवन देतं आहे. आता वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे आम्ही लोकांना ज्या शंका होत्या त्या दूर केल्या आहेत, असं पतंजलीने म्हटलं आहे.

भारतातल्या करोडो लोकांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. यामध्ये आपली आधुनिक उपचार पद्धती आणि योग आणि आयुर्वेदाचा फार मोठा वाटा आहे. करोडो लोक आपल्या घरामध्ये राहून काढा पीत होते, योग करत होते. कोरोनाबरोबरच अनेक आजारांवरची औषधं पतंजलीने मार्केटमध्ये उपलब्ध करुन दिली आहे, असं रामदेव बाबा म्हणाले.

हैदराबादमधील स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोरोना व्हायरसवर कोव्हॅक्सिन लस विकसित केली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिड 19 लस तयार केली आहे. देशभरातील विविध राज्यांत लसीचे डोस वितरित झालेले आहेत. तसंच लसीकरणाचे टप्पेही सुरु झाले आहेत.

(Ramdev baba Patanjali releases Scientific research paper on Medicine Covid 19)

हे ही वाचा :

राज्यातील धडाडीच्या मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना, दोन दिवसात 4 मंत्री पॉझिटिव्ह

अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भाषा शिकणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI