AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप खासदार रवि किशन यांचा मायावतींच्या BSP मध्ये प्रवेश? व्हायरल व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार आणि नगरसेवकांमध्ये फोनवरून एकमेकांना टोमणे मारले. नगरसेवकाने पावसाची परिस्थिती सांगण्यासाठी कॉल केला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांना टोमणे मारले.

भाजप खासदार रवि किशन यांचा मायावतींच्या BSP मध्ये प्रवेश? व्हायरल व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 7:47 AM
Share

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये शनिवारी दुपारी कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने विविध भागात पाणी साचलं आहे. रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अनेक घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याने शहराची परिस्थिती सांगण्यासाठी नगरसेवकाने गोरखपूरचे खासदार रवि किशन यांना फोन केला. परंतु दोघांनी एकमेकांना शा‍ब्दिक टोले लगावले.

दोघांमधील संवादादरम्यान रवि किशन यांनी नगरसेवकाला विचारलं की, समाजवादी पक्षात कधी सामील झालात? त्यानंतर नगरसेवकाने देखील उत्तर दिलं. नगरसेवक म्हणाले, खासदार जी, तुम्ही बसपामध्ये कधी प्रवेश केला? असा सवाल त्यांनी केला. दोघांमधील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसळधार पावसमुळे गोरखपूरच्या विविध भागात पाणी साचलं. या समस्येवरून नगरसेवक विश्वास त्रिपाठी यांनी खासदार रवि किशन यांना कॉल केला. शहराची परिस्थिती सांगण्यासाठी फोन केला. शहरातील विविध भागात पाणी साचल्याने लोकांना त्रास होत असल्याचे नगरसेवक त्रिपाठी हे खासदार रवि किशन यांना सांगत होते. या दोघांमधील संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवि किशन यांनी नगरसेवकाला समाजवादी पक्षात कधी प्रवेश केला, असं म्हणत टोला लगावला.

विश्वजित त्रिपाठी यांनी म्हटलं की, मी शहरातील समस्या सांगत आहे, यामध्ये पक्षाचा विषय कुठून आला? असे त्यांनी म्हटलं. त्यानंतर संतापलेल्या विश्वजीत यांनीही रवि किशन यांना तुम्ही बसपा मध्ये कधी प्रवेश केला, असा सवाल केला. दोघांनी एकमेकांना राजकीय टोलेबाजी लगावले. दरम्यान, विश्वजीत त्रिपाठी यांनी आधी समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगरसेवकाच्या जुन्या राजकीय इतिहासावरून रवि किशन यांनी टोमणा मारला. परंतु नगरसेवकाने बसपाचा उल्लेख करून प्रत्युत्तर दिलं. दोघांमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या वादानंतर खासदार रवि किशन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कोणत्या विभागात अधिक प्रमाणात पाणी साचलं आहे, याची माहिती दिली. सलग 48 तासांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे विविध भागात पाणी साचल्याचे त्यांनी सांगितले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?