AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टार चिन्ह असलेल्या 500 च्या नोटेबाबत सोशल मीडियावर खळबळ, अखेर RBI ला द्यावे लागले स्पष्टीकरण

सोशल मीडियावर सध्या ५०० रुपयांच्या नोटेची चर्चा आहे. कारण याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. अखेर आरबीआयने यावर परिरत्रक जारी केले आहे.

स्टार चिन्ह असलेल्या 500 च्या नोटेबाबत सोशल मीडियावर खळबळ, अखेर RBI ला द्यावे लागले स्पष्टीकरण
| Updated on: Jul 28, 2023 | 3:24 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर सध्या ५०० च्या ( 500 Rupee Note ) नोटीबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. याबाबत आता रिझर्व्ह बँकेनेच पत्रक काढून स्पष्ट केले आहे. सध्या चलनात असलेली ५०० ची ही नोट खूप चर्चेत आहे. 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्यानंतर आता ५०० नोटांबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण सोशल मीडियावर ५०० च्या नोटेवर असलेल्या स्टार बाबत शंका उपस्थित केली जात आहे. स्टार असलेली नोट ही वैध नसल्याचं यात म्हटलं आहे.

रिझर्व्ह बँकेकडून स्पष्टीकरण

चलनात असलेल्या नोटांच्या आकड्यांमध्ये स्टार असलेल्या नोटबाबत गुरुवारी सायंकाळी रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक जारी केले. या नोटा इतर वैध नोटांप्रमाणेच असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे ही नोट सगळीकडे चालू शकते. कोणतीही बँक ती घेण्यास नकार देणार नाही.

स्टार असलेली नोट का छापली गेली?

रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, काही वेळा काही नोटा छापखान्यात चुकीची छाप पडते. त्याच नोटेच्या बदल्यात ज्या इतर नोटा छापल्या जातात, त्या नोटेवरील नंबर पॅनेलमध्ये तारेचे चिन्ह जोडले गेले आहे. अनुक्रमांक असलेल्या नोटांच्या बंडलमध्ये चुकीच्या पद्धतीने छापलेल्या नोटांच्या बदल्यात तारांकित चिन्ह असलेल्या नोटा जारी केल्या जातात. पण ही बनावट नोट नाही.

आरबीआयने म्हटले आहे की, स्टार चिन्ह असलेली नोट ही इतर नोटेप्रमाणेच वैध आहे. त्याचे तारेचे चिन्ह फक्त सूचित करते की ते बदललेल्या किंवा पुनर्मुद्रित नोटच्या जागी जारी केले गेले आहे. तारेची ही खूण नोटची संख्या आणि त्यापूर्वी प्रविष्ट करावयाची अक्षरे यांच्यामध्ये ठेवली जाते. ही प्रणाली 2006 मध्ये सुरू करण्यात आली.

2000 रुपयांची नोट जमा करण्याचे आवाहन

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, ज्यांच्याकडे 2,000 रुपयांची नोट आहे तो ती आपल्या बँक खात्यात जमा करू शकतो किंवा बँकेत दुसरी नोट बदलून घेऊ शकतो. बँकांना 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.