दिल्ली स्फोटात जीव गेलेल्या लोकांची यादी पुढे, तब्बल इतके जखमी, वाचा संपूर्ण यादी
दिल्ली पोलिसांनी हल्ल्याशी संबंधित तब्बल 13 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतंय. या घटनेनंतर संपूर्ण दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला आहे. या स्फोटाबद्दल धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहेत.

दिल्लीच्या लाल किल्लाजवळ मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना नसून दहशतवादी हल्ला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे येतंय. ज्या कारमध्ये स्फोटके होती ती कार 3 तास लाल किल्लाजवळ होती. हेच नाही तर तोंडावर काळे मास्क लावलेला व्यक्ती ही i-20 कार वर्दळीच्या ठिकाणाहून घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा दहशतवादी मोहम्मद उमर असल्याची माहिती मिळतंय. दिल्ली स्फोटाचे कनेक्शन थेट जम्मू काश्मीरच्या पुलवामापर्यंत जाऊन पोहोचले आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. जैश-ए-मोहम्मदशी या हल्ल्याची संबंध असल्याची काही पुरावे मिळत आहेत.
दिल्ली पोलिसांनी हल्ल्याशी संबंधित तब्बल 13 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतंय. या घटनेनंतर संपूर्ण दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला आहे. अपघातात जखमी आणि मृतांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत स्फोटात मृत्यू झालेल्यांची यादी जाहीर करण्यात आलीये. अमरोहा येथील अशोक कुमार आणि दिल्लीतील रहिवासी अमर कटारिया यांच्यासह इतर सहा जणांचा समावेश या यादीत आहे.
जखमींमध्ये दिल्ली येथील मोहम्मद सैफुल्ला यांची मुलगी शैना परवीन, हर्षुल, रा. उत्तराखंड, शिवा जैस्वाल, रा. देवरिया, उत्तर प्रदेश, समीर मुलगा अज्ञात, मंडवली, जोगिंदर, रा. दिल्ली, भवानी शंकर शर्मा, रा. भवानी शंकर शर्मा यांचा समावेश आहे. या स्फोटानंतर अमित शहा यांनी रूग्णालयात भेट देत जखमी लोकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेचा आढावा घेतला.
दिल्ली येथे झालेल्या स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर कारने पेट घेतला. जवळच उभ्या असलेल्या एक दोन कारनाही आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासे येताना दिसत आहेत.





