AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज दोन घोट प्या, किंवा दोन पेग…, मद्यप्रेमींच्या दारूची झिंग उतरवणारी बातमी, रिपोर्टने जगभरात मोठी खळबळ

अनेकांना नियमितपणे दारू पिण्याची सवय असते, अशा लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एक रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दररोज दोन घोट प्या, किंवा दोन पेग..., मद्यप्रेमींच्या दारूची झिंग उतरवणारी बातमी, रिपोर्टने जगभरात मोठी खळबळ
liquorImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 10, 2026 | 6:49 PM
Share

मद्यप्रेंमींची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या एका सरकारी संस्थेकडून आलेल्या रिपोर्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तु्म्ही दररोज एक घोट जरी नियमितपणे दारू पिली तरी देखील ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं या रिपोर्टमधून समोर आलं आहे. तुम्ही दोन घोट दारू प्या, किंवा दोन पेग प्या दारू ही तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एखादा व्यक्ती दररोज फक्त दोन घोट जरी नियमितपणे दारूचं सेवन करत असला तरी त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता ही अधिक असते, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जर तुम्ही दररोज दोन पेग दारू पिली तर त्यामुळे अकाली मृत्यूचा धोका अधिकच वाढतो असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता या रिपोर्टवर अमेरिकेतील दारू कंपन्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

जर्नल ऑफ स्टडीज ऑन अल्कोहोल अँण्ड ड्रग्समध्ये या संदर्भात दावा करण्यात आला आहे. सुरुवातीला हा रिपोर्ट अमेरिकन सरकारने सार्वजनिकच केला नाही, असा देखील आरोप करण्यात आला होता. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार हा रिपोर्ट जनतेसमोर यावा अशी अमेरिकन सरकारची इच्छाच नव्हती, मात्र जेव्हा सातत्याने प्रयत्न झाले, तेव्हा हा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला आहे. या रिपोर्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तुम्ही दररोज दोन घोट जरी दारू पिली तरी तुमचा आकाली मृत्यू होण्याची शक्यता अधिक वाढते, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

रिसर्च कर्त्यांकडून असा दावा करण्यात आला आहे की, या रिपोर्टमध्ये त्यांनी दारू पिण्याच्या दोन पद्धतीचा अभ्यास केला आहे. त्यांनी सुरुवातीला अशा लोकांसोबत संवाद साधला, जे दिवसाला नियमितपणे फक्त दोन घोट दारू पित होते. त्या लोकांचं असं म्हणणं होतं की, दिवसाला दोन घोट दारू ही शरीरासाठी फायद्याची आहे. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, प्रति हजार जणांमागे अशी एक केस आढळून आली की जो व्यक्ती नियमितपणे दारूचं सेवन करत होता, आणि त्याचा मृत्यू अकाली मृत्यू झाला. या लोकांना दारूसंबंधित काही आजार जडले होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर काही जणांचा दारू पिल्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ