मोठी बातमी! रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
दिल्लीमध्ये भाजपनं आपच्या गडाला सुरुंग लावत सत्ता मिळवली, तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आणि दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

दिल्लीमध्ये भाजपनं आपच्या गडाला सुरुंग लावत सत्ता मिळवली, तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली. दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव आता समोर आलं आहे, रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत.
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रेखा गुप्ता या आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पक्षाचे दोन निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनखड यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर कोण असावं? यावर दिल्लीच्या आमदारांसोबत वन टू वन चर्चा केली, त्यानंतर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे, त्या उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपला सत्ता मिळाली आहे, भाजपनं आपच्या या गडाला सुरुंग लावत सत्ता काबीज केली. मात्र स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत सस्पेंस कायम होता. त्यानंतर पक्षाचे निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनखड यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर कोण असावं? यावर दिल्लीच्या आमदारांसोबत वन टू वन चर्चा केली. त्यानंतर आज भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रेखा गुप्ता या दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांच्याकडे आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सुत्रं असणार आहेत. भाजपसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे, कारण तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली आहे.
दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री
आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत, रेखा गुप्ता यांच्यापूर्वी भाजपच्या सुषमा स्वराज, काँग्रेसच्या शीला दीक्षित तर आपल्या आतिशी या देखील दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा 27 वर्षानंतर दिल्लीची सत्ता भाजपला मिळाली आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत.