कोकणला परतीच्या पावसाने झोडपले, मुंबई- ठाणे मात्र कोरडे, उद्याही या भागात सरींची शक्यता

मुंबई आणि ठाणे भागात हवामान कोरडे असले तरी राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावरील काही भागात परतीच्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत.पावसाने अनेक ठिकाणी उकाड्यातून नागरिकांची सुटका केली आहे.उद्याही कोकण आणि घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

कोकणला परतीच्या पावसाने झोडपले, मुंबई- ठाणे मात्र कोरडे, उद्याही या भागात सरींची शक्यता
rain alert in konkan
| Updated on: Oct 06, 2026 | 8:29 PM

राज्यातील बहुतांशी भागात आता पावसाने निरोप घेतला आहे तर काही ठिकाणी परतीचा पावसाचा शिडकावा होत असल्याने उकाड्यापासून सुटका मिळत आहे. मुंबई आणि ठाण्यात हवामान कोरडे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही काही भागात परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे.वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुका अशा सह्याद्री पट्ट्याला पावसाने झोडपले आहे. घोटगे पंचक्रोशी, दिगवळे, नारूर, शिवापूर, आंबोली परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे वातावरणातील उकाडा गायब होऊन काहीसा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातून मान्सूनने परतीचा प्रवास केला असून, हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस हजेरी लावत आहे.

हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी परतीच्या पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे. कोकण आणि घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावरही हलक्या सरी पडू शकतात असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Loading...

मुंबई आणि ठाण्यात कोरडे हवामान, उष्णता वाढणार

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असली तरी अनेक भागांत ऑक्टोबर हिटमुळे उकाडा जाणवत आहे. मुंबई आणि उपनगरात सध्या हवामान मुख्यतः स्वच्छ आणि कोरडे असून काहीसा उकाडा वाढला आहे. हवेत प्रदुषणाचे प्रमाण जास्त असल्याने ज्यांची प्रकृती संवेदनशील आहे त्यांनी बाहेर फिरताना काळजी घ्यावी असे म्हटले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us