AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Romeo in Indian Navy : भारतीय नौदलातले हे 2 रोमियो पाहा, भारताच्या दुष्मनांची झोप उडवतात

रोमियो हेलिकॉप्टरचे एकूण पाच प्रकार आहेत. याशिवाय त्यांच्या निर्यातीच्या गुणवत्तेनुसार बदल केले जातात. त्यांचा वापर पाळत ठेवणे, हेरगिरी, व्हीआयपी मुव्हमेंट, हल्ला, पाणबुडी शोध यासाठी केला जाऊ शकतो. हे अनेक प्रकारच्या कामांसाठी वापरले जाऊ शकते.

Romeo in Indian Navy : भारतीय नौदलातले हे 2 रोमियो पाहा, भारताच्या दुष्मनांची झोप उडवतात
भारतीय नौदलातले हे 2 रोमियो पाहा, भारताच्या दुष्मनांची झोप उडवतातImage Credit source: twitter
| Updated on: Jul 29, 2022 | 7:16 PM
Share

नवी दिल्ली : दोन रोमिओ हेलिकॉप्टर (Romeo Helicopter) भारतीय नौदलात (Indian Navy) सामील झाले आहेत. रोमियो नावावर हलक्यात घेऊ नका कारण हे रोमिओ सध्या भारताच्या दुष्मनांना धडकी भरवत आहेत. यांचं खरं नाव MH 60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर (MH 60R Multi-Role Helicopter) आहे. त्याच्या नावातील आर हे रोमियोचे संक्षिप्त केलं आहे. असेच आता आणखी 21 हेलिकॉप्टर येणार आहेत. त्यांना येण्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील. हे हेलिकॉप्टर भारतीय नौदलाच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौका IAC विक्रांतवर देखील तैनात केले जाऊ शकते. MH 60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर अमेरिकेच्या Skorsky Aircraft कंपनीने बनवले आहे. रोमियो हेलिकॉप्टरचे एकूण पाच प्रकार आहेत. याशिवाय त्यांच्या निर्यातीच्या गुणवत्तेनुसार बदल केले जातात. त्यांचा वापर पाळत ठेवणे, हेरगिरी, व्हीआयपी मुव्हमेंट, हल्ला, पाणबुडी शोध यासाठी केला जाऊ शकतो. हे अनेक प्रकारच्या कामांसाठी वापरले जाऊ शकते.

भारतीय नौदलाचे ट्विट

किती लोक बसू शकतात?

रोमियो हेलिकॉप्टरवर डझनभर प्रकारचे सेन्सर आणि रडार बसवण्यात आले आहेत, जे शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याची माहिती देतात. ते उडवण्यासाठी 3 ते 4 क्रू मेंबर्स लागतात. याशिवाय त्यात 5 जण बसू शकतात. त्याचे जास्तीत जास्त टेकऑफ वजन 10,433 किलो आहे. म्हणजेच संपूर्ण शस्त्रे आणि सैनिकांसह आकाशात झेप घेऊ शकतात. त्याची लांबी 64.8 फूट आहे. उंची 17.23 फूट आहे.

कोणती शस्त्रं बसवली जाऊ शकतात?

MH 60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर दोन जनरल इलेक्ट्रिकच्या टर्बोशाफ्ट इंजिनद्वारे चालवले जात आहे. जे टेकऑफच्या वेळी 1410×2 kW ची पॉवर निर्माण करतात. त्याच्या मुख्य पंख्याचा व्यास 53.8 फूट आहे. हे हेलिकॉप्टर एकावेळी 830 किमी अंतर कापू शकते. जास्तीत जास्त 12 हजार फूट उंचीवर उड्डाण करू शकते.याचा सरळ वेग 1650 फूट प्रति मिनिट आहे. रोमियो हेलिकॉप्टर कमाल 270 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते. पण गरज भासल्यास वेग ताशी 330 किलोमीटरपर्यंत वाढवता येईल. यात दोन मार्क 46 टॉर्पेडो किंवा MK 50 किंवा MK 54s टॉर्पेडो बसवले जाऊ शकतात. याशिवाय 4 ते 8 AGM-114 हेलफायर क्षेपणास्त्रे बसवता येतील.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....