Gen-Z सोबत भाजपचे पॅचअप? भागवतांचा तरुणाईशी संवाद सेतू, सरसंघचालकांचा नेमका हेतू काय?

RSS Chief Mohan Bhagwat: सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत Gen Z आणि Gen अल्फासोबत संवाद साधला. ही केवळ चर्चा नव्हती, संवाद नव्हता तर तो एक राजकीय आणि सामाजिक दिशा निश्चित करण्यासाठी त्यांनी वैचारिक संदेश दिला आहे, असे मानले जात आहे.

Gen-Z सोबत भाजपचे पॅचअप? भागवतांचा तरुणाईशी संवाद सेतू, सरसंघचालकांचा नेमका हेतू काय?
सरसंघचालक मोहन भागवत
| Updated on: Aug 08, 2026 | 11:06 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील वैचारिक नाते सर्वश्रुत आहे. भाजप आणि देशातील जेन झी, जेन अल्फा पिढीतील विसंवाद जंतरमंतरवरील CJP आंदोलावरून समोर आला. तरुणाई सरकारविरोधात आंदोलन उभारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टावर व्हिडिओ शेअर करत या नवीन पिढीशी संवाद साधला. पण सरकारविरोधातील धग कमी झाली नाही. भाजप आणि तरुणाई यांच्यात आता सरसंघचालक मोहन भागवत संवाद सेतू साधत आहेत. भाजपसाठी संघ मैदानात उतरल्याचे दिसून आले आहे.

तरुणाईची नाडी अचूक ओळखली

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत गुरुवारी Gen Z आणि Gen Alpha या नवीन पिढीसोबत चर्चा एक संवाद नाही. तर येत्या राजकीय आणि सामाजिक दिशा निश्चित करण्याचा एक विचार मानल्या जात आहे. मुंबईत तरुणाईशी संवाद साधताना सरसंघचालकांची देहबोली, त्यांची मिश्किल उत्तरं, त्यांची भाषा बरेच काही सांगून गेली. दिल्लीतील जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन संपले. त्याच्या दोन आठवड्यानंतर भागवतांनी तरुणाईशी संवाद साधला. भाजपला तरुणाईची ही भाषा ओळखता आली नाही. पण भागवतांनी तरुणाईची नाडी अचूक पकडल्याचे मानले जात आहे.

सरसंघचालकांचा Gen Z सोबत संवाद

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये तरुणाईशी संवाद साधला. भागवत हे इंग्रजीत फार बोलत नाही. पण गुरुवारी त्यांनी तरुणाईशी संवाद साधताना इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांचा वापर केला. त्यांनी तरुणाई आणि सरकारमधील वाढलेल्या अंतरावर भाष्य केले. तरुणाईने त्यांच्या प्रश्नावर सरकारला उत्तर मागितले. त्यासाठी तरुणाई देशभरात रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. तरुणाईच्या तक्रारी सरसंघचालकांनी ऐकल्या आणि त्या मान्यही केल्या. विद्यार्थ्यांना विरोध करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी मान्य केले. आवाज उठवणारे तरुण राष्ट्रविरोधी असल्याचा दावाही त्यांनी खोडून काढला. भागवतांनी बेरोजगारी, शिक्षण आणि आरक्षण या मुद्यांवर पण मत मांडले. तरुणाईने प्रश्नांवर आवाज उठवला. त्यावर तर्कसंगत उत्तर मिळण्याची अपेक्षा होती असे भागवत म्हणाले. त्यामुळे आता तरुणाई आणि भाजपमधील संवाद पुल भागवत बांधत असल्याचे दिसून आले. भाजपसाठी भागवत मैदानात उतरल्याचे मानले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us